Nashik News: नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी CM शिंदे मैदानात! अजित पवारांना शह देण्यासाठी मोर्चेबांधणी; दिवसभर बैठकांचा धडाका

Maharashtra Vidhan Parishad Election 2024: नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. आज शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी मुख्यमंत्री उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत.
Nashik News: नाशिक शिक्षक मतदार संघासाठी CM शिंदे मैदानात! अजित पवारांना शह देण्यासाठी मोर्चेबांधणी; दिवसभर बैठकांचा धडाका
CM Eknath ShindeSaam Tv

नाशिक, ता. २२ जून २०२४

लोकसभेच्या निवडणुकांचा धुरळा संपताच राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा विधानपरिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. नाशिक शिक्षक मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले असून आज किशोर दराडे यांच्या उत्तर महाराष्ट्र दौरा करणार आहेत.

Nashik News: नाशिक शिक्षक मतदार संघासाठी CM शिंदे मैदानात! अजित पवारांना शह देण्यासाठी मोर्चेबांधणी; दिवसभर बैठकांचा धडाका
Nashik News : नाफेडच्या खरेदी केंद्रांवर गैरकारभार; अध्यक्षांच्या भेटीत आले उघडकीस, केंद्रांची होणार चौकशी

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. आज शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी मुख्यमंत्री उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यामध्ये ते नाशिक, शिर्डी आणि जळगावमध्ये बैठका घेणार असून नाशिक, नगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्या पदाधिकारी आणि शिक्षकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठका घेणार आहेत.

नाशिक शिक्षक मतदार संघासाठी महायुतीमध्येच महामुकाबला पाहायला मिळणार आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे भाजपनेही एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन दादा गटाला धक्का दिला आहे.

Nashik News: नाशिक शिक्षक मतदार संघासाठी CM शिंदे मैदानात! अजित पवारांना शह देण्यासाठी मोर्चेबांधणी; दिवसभर बैठकांचा धडाका
Nashik City Bus Service : नाशिक सिटी लिंक बस सेवा ठप्प, प्रवाशांचे हाल; कर्मचा-यांनी पगार थकल्याने पुकारला संप

त्यामुळेच नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. अशातच मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरल्यामुळे त्यांच्या आजच्या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com