Manoj Jarange Patil Video: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा खालावली, डॉक्टरांनी लावलं सलाईन; हृदयाची होणार तपासणी

Manoj Jarange Patil News: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली असून डॉक्टर त्यांची तपासणी करत आहेत. जरांगे यांच्या हृदयाची तपासणी करण्यात येणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा खालावली, डॉक्टरांनी लावलं सलाईन; हृदयाची होणार तपासणी
Manoj Jarange PatilSaam Tv

एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत. त्यांना पुन्हा सलाईन लावण्यात आल्याचं समजतंय. त्यांच्या हृदयाची तपासणी देखील करण्यात येणार आहे. टूडी इको, इसीजीसह अत्याधुनिक मशीनद्वारे त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारानंतर काल त्यांनी डिस्चार्ज घेल्यानंतर ते बीड जिल्ह्यातील साखरवाडी येथे गेले होते. त्यादरम्यानच्या काळात त्यांच्या कमरेला एकदम झटका बसला, असं त्यांचं म्हणणं आहे. यानंतर दुपारच्यावेळी ते पुन्हा याच रुग्णालयात दाखल झाले.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा खालावली, डॉक्टरांनी लावलं सलाईन; हृदयाची होणार तपासणी
Bhandardara Dam VIDEO: भंडारदरा धरणात बुडून एकाचा मृत्यू, बुडण्याचा लाईव्ह थरार कॅमेरात कैद

यातच आज काही वेळापूर्वी त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यांना हृदयात वेदना होत असल्याचं जाणवू लागलं. त्यानुसार डॉक्टरांनी आता तपासणी सुरु केली आहे. यात टूडी इको, इसीजीसह वेगवेगळी तपासणी केली जात आहे. अचानक त्यांची तब्येत खालावल्याने डॉक्टर त्यांना नेमकं काय झालं आहे, याची तपासणी करत आहेत.

तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना नेमकं काय झालं आहे, हे समजू शकेल आणि यानंतर योग्य उपचार करता येईल. गेल्या सहा महिन्यांपासून उपोषण आणि सततच्या दौऱ्यामुळे यामुळे त्यांच्या तब्येतीवर मोठा परिणाम झाला आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा खालावली, डॉक्टरांनी लावलं सलाईन; हृदयाची होणार तपासणी
VIDEO: लक्ष्मण हाकेंनी उपोषण केलं स्थगित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

जरांगे यांच्या प्रकृतीची माहिती देताना डॉक्टर म्हणाले की, त्यांना काल डिस्चार्ज दिल्यानंतर ते त्यांच्या नियोजित कार्यक्रम स्थळी गेले होते. तिथे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना आज पुन्हा रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. आता पुन्हा त्यांच्या पूर्ण शरीराची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये त्यांना डिहायड्रेशनचा त्रास असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना आरामची आवश्यकता आहे. तसेच त्यांना काही दिवस रुग्णालयात राहण्याची आवश्यकता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com