Bhandardara Dam VIDEO: भंडारदरा धरणात बुडून एकाचा मृत्यू, बुडतानाचा थरार कॅमेरात कैद

Ahmednagar News: अहमदनगरमधील भंडारदरा धरणात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुण बुडत असल्याची ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे.
भंडारदरा धरणात बुडून एकाचा मृत्यू, बुडण्याचा लाईव्ह थरार कॅमेरात कैद
Bhandardara Dam VIDEOSaam Tv

सचिन बनसोडे, साम टीव्ही, शिर्डी प्रतिनिधी

अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील भंडारदरा धरणात एकाच बुडून मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. सद्दाम शेख, असं बुडून मृत्यू झालेला तरुणाचं नाव असल्याचं समजतंय. सद्दाम हा शिर्डी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

भंडारदरा धरण परीसरात फिरायला सहा तरुण आले होते. यावेळी ते धरणात पोहोण्यासाठी निघाल्याचं समजतंय. मात्र धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने सद्दाम पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र यामध्ये त्यांना यश आलं आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

भंडारदरा धरणात बुडून एकाचा मृत्यू, बुडण्याचा लाईव्ह थरार कॅमेरात कैद
Manoj Jarange Patil Video: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा खालावली, डॉक्टरांनी लावलं सलाईन; हृदयाची होणार तपासणी

मिळालेल्या माहितीनुसार, सद्दाम हा त्याच्या मित्रांसोबत भंडारदरा परिसरात पर्यटनासाठी गेला होता. यावेळी त्यांना भंडारदरा धरणात पोहोण्याचा मोह त्यांना आवरला नाही. यावेळी काही तरुण भंडारदरा धरणाच्या पाण्यात उतरले. मात्र धरणात एका ठिकाणी मोठा खड्डा होता. पोहोचताना याचा त्यांना अंदाज न आल्याने सद्दाम शेख हा तरुण त्याठिकाणी बुडाला.

भंडारदरा धरणात बुडून एकाचा मृत्यू, बुडण्याचा लाईव्ह थरार कॅमेरात कैद
VIDEO: लक्ष्मण हाकेंनी उपोषण केलं स्थगित, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

सद्दाम बुडत असताना त्याच्या सोबत पाण्यात उतरलेल्या त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने सद्दामला वाचवण्यात त्याच्या मित्राला अपयश आलं आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिर्डी परिसरात शोककळा पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com