Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal Saam Digital
महाराष्ट्र

VIDEO: 'आरक्षण हिसकावण्यात आयुष्य गेलं, मराठे ओबीसीतूनच आरक्षण घेणार' ,जरांगे भुजबळांवर पुन्हा कडाडले

Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal: आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघालंय. मनोज जरांगेंनी सरकारला एक महिन्याची वेळ देऊन उपोषण थांबवलं असलं तरी भुजबळांवरचे प्रहार थांबलेले नाहीत. भुजबळांनी मराठ्याचं आरक्षण हिसकावुन घेतल्याचा आरोप जरांगेंनी केलाय.

Girish Nikam

गेल्या वर्षभरापासून राज्यात मराठा आरक्षणावरुन मराठा आणि ओबीसी असा संघर्ष सुरु आहे. लोकसभा निवडणुकीतही त्यांचे पडसाद उमटले. सत्ताधारी महायुतीला मोठा फटका बसला. राज्यात ठिकठिकाणी मेळावे घेऊन सुरु झालेलं भुजबळ विरुद्ध जरांगे यांचं वाकयुद्ध आजही कायम आहे.

मराठ्यांना स्वतंत्र १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. मात्र सगेसोयऱ्यांना कुणबीचे दाखले देण्यासाठी जरांगेंचा लढा सुरुच आहे. सरकारला १३ जुलैपर्यंत एक महिन्याची मुदत देऊन त्यांनी उपोषण स्थगित केलं. मात्र भुजबळांवर त्यांचे प्रहार सुरुच आहेत. मराठ्यांचं आरक्षण हिसकावून घेण्यात भुजबळांचं आयुष्य गेल्याची टीका जरांगेंनी केली आहे.

जरांगे अशी तिखट टिका करत असताना भुजबळही ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये या भुमिकेवर ठाम आहेत. मलाही कितीही शिव्या दिल्या तरी मागे हटणार नाही, असं ते म्हणालेत.

तर दुसरीकडे जालन्यात उपोषणाला बसलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही जरांगेंवर निशाणा साधलाय. 'फोडा आणि झोडा' ही जरांगेंची नीती असल्याचीही टीका हाकेंनी केलीय.

आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात मराठा आणि ओबीसी अशी दुफळी निर्माण झाली आहे. सगेसोय-यांबाबतच्या मुद्यावर सरकार काय तोडगा काढणार हे महत्वाचं आहे. अन्यथा आगामी विभानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जरांगे आणि भुजबळांमधला संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: दारूच्या नशेत पतीने जंगलात नेऊन पत्नीचा गळा दाबला - गडचिरोली

Most Expensive School: १ कोटी रुपये फी अन् शाही थाट, 'ही' आहे जगातील सर्वात महागडी शाळा

लालबाग परिसरात भयंकर अपघात, २ मुलांना भरधाव वाहनानं चिरडलं; चिमुकलीचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT