Maharashtra Lok Sabha Election 2024: Announcement of Four Candidates from Madha Constituency after Appeal of Manoj Jarange Patil  Saam TV
महाराष्ट्र

Maratha Aarakshan News: मराठा समाज लोकसभेच्या रिंगणात, मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर माढा मतदारसंघातून उमेदवारांची घोषणा

Maharashtra Lok Sabha Election 2024: Madha Lok Sabha Candidate News | मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानुसार, माढा लोकसभेसाठी पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातील चार उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

प्रविण वाकचौरे

Madha Lok Sabha Constituency News:

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचं साखळी उपोषण अद्यापही सुरु आहे. मात्र राजकीय नेत्यांना धडा शिकवण्यासाठी मराठा बांधवांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं.

आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मराठा उमेदवार देण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला होता. त्यानुसार माढा लोकसभा मदतदारसंघातसाठी मराठा समाजाच्या चार उमेदवारांची घोषणा आज झाली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानुसार, माढा लोकसभेसाठी पंढरपूर तालुक्यातील पळशी गावातील चार उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. ही मागणी मान्य करण्यासाठी जरांगे यांनी आता निवडणुकीच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (Latest Marathi News)

त्यासाठी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे मराठा समाज बांधवांना आवाहन केले आहे. त्यानुसार पळशी येथील मराठा समाज बांधवांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार धनंजय कलागते, संतोष झांबरे, विठ्ठल काटवटे आणि सचिन पवार यांची माढ्यातून उमेदवारी जाहीर केली आहे.

मनोज जरांगेची एसआयटी चौकशी रद्द करा

मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आंदोलनावर लावण्यात आलेली विशेष चौकशी समिती अर्थात एसआयटी (SIT) रद्द करा, अशी मागणी राज्यभरात होऊ लागली आहे. एसआयटी चौकशीच्या आदेशाबाबत मराठा समाजाने निषेध नोंदवला आहे. ही चौकशी मागे घेण्यात यावी, अन्यथा समाजात असंतोष पसरून समाज उग्र आंदोलन करेल असा इशारा अर्धापूर येथील सकल मराठा समाजाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT