Nana Patole Bhandara News
Nana Patole Bhandara NewsSaam tv

Nana Patole News: कोल्हापूरची जागा शाहू महाराजांना मिळणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे सूचक विधान; म्हणाले...

Maharashtra Politics: मुंबई वगळून ही चर्चा आज केली जात आहे. सहा तारखेला महाविकास आघाडीची मिटींग होणार आहे . त्यावर चर्चा होईल, असे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.
Published on

रुपाली बडवे, मुंबई|ता. ५ जानेवारी २०२४

Nana Patole Press Conference:

महाविकास आघाडीमधील जागा वाटपांच्या चर्चेचा तिढा अद्याप सुटत नसल्याचे चित्र दिसत आहे.  वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर मविआसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. परंतु, अद्यापही जागावाटपाबाबत तिढा सुटलेला नाही. याबाबत आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वाचे विधान केले आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

स्थानिक नेत्यांची चौकशी करायची आहे. त्यानंतर आम्ही तिकीट वाटप करू. आमच्याकडे दुसऱ्यांसारखे नाही, की तिकीट वाटप झाले आणि लोकांनी जागा सोडल्या. २२ जागांच्या जिल्ह्यांच्या नेत्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत. मुंबई वगळून ही चर्चा आज केली जात आहे. सहा तारखेला महाविकास आघाडीची मिटींग होणार आहे . त्यावर चर्चा होईल, असे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.

भाजपवर टीका...

मला दु:ख होते. नितीन गडकरी हे राज्याचे मोठे नेते आहेत. भावी पंतप्रधान म्हणून गडकरी यांचे नाव घेतले जात होते. पण त्यांचे नाव या यादीत नाही. ते भाजप परिवार राहिले नाही. ते आता मोदी परिवार झाले आहेत. देवेंद्र फडणवीस आता भाजपचे राहीले नाहीत ते मोदी परिवाराचे झाले आहेत, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.

Nana Patole Bhandara News
Police Bharti 2024: तरुणांसाठी खूशखबर! पोलीस भरती प्रक्रिया आजपासून सुरु; कुठे आणि कसा कराल अर्ज?

तसेच "कोल्हापूरची जागा जागा शाहू महाराजांना सोडायची हे महाविकास आघाडीचे ठरले आहे. त्या बदल्यात ही जागा ती जागा असे काही नाही. जे काही आहे ते ६ तारखेला फायनल होईल," असेही नाना पटोले म्हणालेत.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची ६ आणि ७ तारखेला मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील. या बैठकीमध्ये लोकसभेच्या जागावाटपाच्या संदर्भात अंतिम चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

Nana Patole Bhandara News
Dharashiv Crime News : धाराशिव पोलिसांची कामगिरी, घरफोडीतील एकासह सात जण अटकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com