काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून भाजपसह सत्तेतील मित्रपक्षांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांच्या कारखान्यांना भरघोस निधी दिल्याचे समोर आले होते. भाजप तसेच अजित पवार गटाला पाठिंबा देणाऱ्या अनेक साखर सम्राटांवर राज्य सरकार मेहेरबान झाल्याचे दिसून आले होते. मात्र यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैजनाथ साखर कारखान्याचे नाव नसल्याने मुंडे समर्थकांडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्य सरकारने निवडणूकीच्या तोंडावर साखर कारखान्यांसाठीची कर्जहमी योजना सुरु केली. यात विविध पंधरा साखर कारखान्यांना 1800 कोटींचे कर्ज मंजूर करण्यात येणार आहेत. यामध्ये मुळा साखर कारखाना, बीडमधील सोळंके साखर कारखाना, किसनवीर साखर कारखाना, कुकडी साखर कारखान्या, ज्ञानेश्वर साखर कारखान्यासह पंधरा कारखान्यांचा समावेश असतांना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याला मदतीतून पुन्हा एकदा डावलले गेल्याचे दिसत आहे.
या कारखान्यांसोबत वैद्यनाथला मदत मिळाली असती तर आर्थिक अडचणींमुळे बंद असलेला वैद्यनाथ कारखाना किमान पुढील हंगामात तरी कार्यान्वित होवून परिसरातील ऊसाचे गाळप करणे शक्य झाले असते. परंतु आता निवडणूकीच्या तोंडावर इतर कारखान्यांना मदत केली जात असतांना पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याला पुन्हा एकदा डावलल्याचेच दिसत आहे.त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी दिसत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मदत केलेले कारखाने
१) भाऊराव चव्हाण सहकारी कारखाना लक्ष्मी नगर नांदेड - 147.79 कोटी
व्यवस्थापन- अशोक चव्हाण
२) संत कुरुमदास सहकारी कारखाना पडसाळी सोलापूर - 59.49 कोटी
व्यवस्थापन - धनाजीराव साठे
३) सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखाना भाळवणी पंढरपूर- 146.32 कोटी रुपये
व्यवस्थापन - कल्याणराव काळे
४) छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर इंदापूर- 128 कोटी रुपये
व्यवस्थापन- प्रशांत काटे
५) जय भवानी सहकारी साखर कारखाना शिवाजीनगर, गेवराई, बीड- 150 कोटी रुपये
व्यवस्थापन - अमरसिंह पंडित
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.