अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाचा आईनेच गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना बीड शहरातील दाऊदपुरा परिसरात घडली. तब्बल १ महिन्यानंतर पोलिसांनी या घटनेचा छडा लावत आईने रचलेला बनाव उघडकीस आणला. याप्रकरणी निर्दयी आईविरोधात पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शेख हजान शेख तैवर (वय १४) असं मृत मुलाचं नाव असून नाजिया शेख असं गुन्हा दाखल झालेल्या निर्दयी आईचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील (Beed News) दाऊदपुरा भागात राहणाऱ्या शेख हजान शेख तैवर (वय १४) या मुलाचा २५ जानेवारी २०२४ रोजी अचानक मृत्यू झाला होता.
घराच्या छतावर पतंग उडवत असताना हजान घरात आला आणि पाणी प्यायल्यानंतर तो चक्कर येऊन बेशुद्ध झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी मृत घोषित केलं, असा जबाब हजानच्या आईने पोलिसांना दिला होता. (Latest Marathi News)
यावरून पेठ बीड पोलिसांनी (Police) आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालातून डॉक्टरांना वेगळीच शंका आली. मान, नाक दाबल्याने श्वास गुदमरून हजान याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे मुलाचा घातपात झाल्याचा पोलिसांना अंदाज आला.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला असता, समोर चक्रावून टाकणारी माहिती समोर आली. हजानच्या आईचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. याची कुणकुण हजानला लागली होती. मुलगा आपल्या संबंधात अडसर ठरत असल्याने आईने त्याचा काटा काढण्याचा प्लान आखला.
२५ जानेवारी २०२४ रोजी हजान आणि त्याच्या आईचा वाद झाला. यावेळी आई नाजिया हिने त्याचा गळा आवळून खून केला. धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा नाजियाने हजानची हत्या केली, तेव्हा घरात ८ वर्षीय दुसरा मुलगा आणि ५ वर्षांची बहीणही हजर होती. त्यांच्यासमोर तिने मुलाचा गळा दाबून खून केल्याचे आढळून आले.
Edited by - Satish Daud-Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.