\BJP Shivsena
\BJP ShivsenaSaam tv

Nandurbar Politics: लोकसभा निवडणुकीआधी भाजप आणि शिंदे गटातील वाद चहाट्यावर, हिना गावितांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध

Shivsena VS BJP in Nandurbar : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हा उफाळून आला असून शिंदे गटाने खासदार डॉ. गावितांच्या एकतर्फी आणि मनमानी कारभाराविरोधात दंड थोपटले आहे.
Published on

सागर निकवाडे | नंदुरबार

Nandurbar News :

राज्याच्या सत्तेत सोबत असलेल्या शिंदे गट आणि भाजपमध्ये ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी नंदुरबारमध्ये वाद उफाळून आला आहे. भाजपच्या खासदार डॉ. हिना गावित ह्या विश्वासात घेऊन कारभार करत नसल्याचा आरोप शिवसेनेने केला. तर नवा उमेदवार देण्याची मागणी देखील केली आहे. त्यामुळे गावित परिवार अडचणीत आला आहे. पक्षांतर्गत त्याच्या विरोधातील नाराजीच्या सुराला देखील यामुळे बळकटी मिळाली आहे.

नंदुरबारमधल्या शिंदे गट आणि भाजपाच्या गावित गटातील वाद हा राज्यात चर्चेचा विषय राहिला आहे. सत्तेतील या दोन्ही मित्रांमध्ये नंदुरबारमध्ये मात्र कधीच घनिष्ठता होऊ शकलेली नाही. त्यामुळेच की काय कधी शिंदे गटाने तर कधी भाजपाने जिल्ह्यातील सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेसच्या फुटीरांशी हात मिळवणी केली. मात्र याचा फटका महायुतीला बसला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

\BJP Shivsena
Uddhav Thackeray: ‘मी पुन्हा येईन’ असा आत्मविश्वास आहे, तर पक्ष फोडाफोडी कशाला करता? ठाकरेंचा भाजपला खोचक सवाल

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा हा उफाळून आला असून शिंदे गटाने खासदार डॉ. गावितांच्या एकतर्फी आणि मनमानी कारभाराविरोधात दंड थोपटले आहे. गावित परिवाराकडे असलेल्या आदिवासी खात्याच्या माध्यमातून शिवसेनेच्या नेत्यांची होणारी अडवणूक थांबत नसल्याने, जिल्ह्यातील शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी थेट सर्वांना सोबत घेऊन चालणारा लोकसभा उमेदवार देण्याची मागणी भाजपा आणि शिंदे गटाकडे केली आहे.  (Latest Marathi News)

दुसरीकेड भाजपच्या खासदार डॉ. हिना गावितांनी शिंदे गटावर पलटवार करत चंद्रकांत रघुवंशी यांचा आपल्याला कायमच विरोध राहिल्याचा आरोप केला. उलट त्यांचीच महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत सलगी असल्याचा आरोप डॉ. हिन गावित यांनी केला आहे.

\BJP Shivsena
Pune Nashik Railway: तर रस्त्यावरची लढाई लढावी लागेल! पुणे-नाशिक रेल्वेच्या प्रश्नाबाबत आमदार तांबे यांचा आक्रमक पवित्रा

या वादानंतर जिल्ह्यातील महायुतीमध्ये सारंकाही अलबेल नसल्याचे स्पष्ट झालं आहे. यातून नेमका कुणाला फायदा होणार, हे येणारा काळच ठरवेल. मात्र दोघांमधील या वादाचा परिणाम नक्कीच लोकसभेच्या मतदानावर होणार असल्याने याबाबत वरिष्ठ स्तरावरुन काय तोडगा निघतो याकडे साऱ्यांच्याच नजरा लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com