Manmad Crime Saam tv
महाराष्ट्र

Manmad Crime : पैसे पडल्याचे सांगत शेतकऱ्याचे दोन लाख लांबविले

Manmad News : दोघा चोरट्यांनी शेतकऱ्याला तुमचे पैसे रस्त्यावर पडले आहे; अशी बतावणी केली. यानंतर शेतकरी कुऱ्हे हे पाहण्यासाठी थांबले

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : शेतात कष्ट करून पिकविलेला मका विकला आणि त्याची मिळालेली रक्कम घेऊन (Manmad) शेतकरी घरी जात होता. मात्र रस्त्यावर पैसे पडल्याची बतावणी करत (Farmer) शेतकऱ्याची दोन लाखाची रोकड घेऊन चोरटे फरार झाले. (Tajya Batmya)

सदरची घटना (Nashik) नाशिकच्या येवला तालूक्यातील अंदरसुल येथे घडलीय. शेतकरी सोमनाथ कुऱ्हे  यांनी शेतात पिकविलेला मका विकून मिळालेले पैसे बँकेतून काढून घरी जात होते. दरम्यान सोमनाथ कुऱ्हे हे मातोश्री शांताबाई सोनवणे स्कूल समोरील पुलावरन जात असताना पाठी मागून दुचाकीवर (Crime News) दोघेजण आले. या दोघा चोरट्यांनी शेतकऱ्याला तुमचे पैसे रस्त्यावर पडले आहे; अशी बतावणी केली. यानंतर शेतकरी कुऱ्हे हे पाहण्यासाठी थांबले असता यावेळी नजर चूकवून शेतक-याच्या ताब्यातील दोन लाख पाच हजाराची रोकड घेऊन पोबारा केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चोरटे सीसीटीव्हीत कैद 

अचानक घडलेल्या या प्रकाराने शेतकरी हादरला. त्यांनी पोलिसात धाव घेत माहिती दिली. येवला तालूका पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अंदरसूल टोल नाक्यावरील (CCTV) सीसीटीव्ही तपासला असता दोघे दुचाकीवरील चोरटे त्यात कैद झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Airport: कसं असेल नवी मुंबई विमानतळ? विमानतळावर 5G कनेक्टिव्हिटी आणि 'डिजी यात्रा' सुविधा

Mumbai News : धक्कादायक! प्रसिद्ध हॉटेलकडून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ; ऑनलाइन मागवलेल्या 'बटर चिकन'मध्ये आढळली माशी

Wednesday Horoscope : आरोग्याच्या तक्रारी वाढणार, जवळच्या लोकांकडून दगाफटक्याची शक्यता; ५ राशींच्या आयुष्यात होणार मोठी घडामोड

भीषण अपघात! धावत्या बसवर कोसळला डोंगराचा ढिगारा, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : पवईमध्ये पेट्रोलपंपावर मोटारसायकला लागली भीषण आग

SCROLL FOR NEXT