Dombivili Crime
Dombivili CrimeSaam tv

Dombivili Crime : भर रस्त्यात महिलेची काढली छेड; स्थानिक तरुणांनी दिला चोप, डोंबिवलीमधील घटना

Dombivili News : आरडा ओरड एकूण स्थानिक तरुणांनी धाव घेतली. हा यावेळी रोड रोमियो पळून जात असताना स्थानिक तरुणांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडून चांगलाच चोप दिला.
Published on

अभिजित देशमुख

कल्याण : कामावरून घरी परतणाऱ्यामहिलेशी भर रस्त्यात लगट करण्याचा प्रयत्न करत तिची छेड काढण्याचा प्रकार रात्रीच्या सुमारास (Dombivali) डोंबिवली पूर्वेकडील आजदे पाडा परिसरात घडली. या तरुणाला स्थानिक तरुणांनी चांगलाच चोप दिला. प्रीतम गायकवाड असे या तरुणाचे नाव असून स्थानिकानी (Crime News) त्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. (Latest Marathi News)

Dombivili Crime
Latur Crime News: आई आणि मोठ्या भावाने मिळून लहान भावाची केली हत्या; घटनेनं लातूर हादरलं

डोंबिवली आजदेपाडा परिसरात राहणारी महिला रात्रीच्या सुमारास कामावरून घरी परतत होती. यावेळी एक रोडरोमियो तिचा पाठलाग करत होता. अंधाराचा फायदा घेत या रोडरोमियोने महिलेचा गळा दाबत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार करत आरडा ओरड सुरू केली. आरडा ओरड एकूण स्थानिक तरुणांनी धाव घेतली. हा यावेळी रोड रोमियो पळून जात असताना स्थानिक तरुणांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडून चांगलाच चोप दिला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dombivili Crime
Success Story : बिलाेलीमधील शेतकऱ्याने एक एकरातील मिरची पिकातून कमावले लाख रुपये

घटनेची माहिती (Manpada Police) मानपाडा पोलिसांना देत या रोड रोमियोला पोलिसांच्या (Police) ताब्यात दिले. प्रीतम गायकवाड यास मानपाडा पोलिसांनी  ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रीतम गायकवाड हा अंधेरी मरोळ येथे राहणारा असून तो डोंबिवलीत त्याच्या नातेवाईकाकडे आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com