Manmad News Saam tv
महाराष्ट्र

Manmad News: मंत्री छगन भुजबळांना धक्का; आरक्षणाच्या मागणीसाठी मनमाड बाजार समिती सभापतींचा राजीनामा

Manmad News : मंत्री छगन भुजबळांना धक्का; आरक्षणाच्या मागणीसाठी मनमाड बाजार समिती सभापतींचा राजीनामा

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात रोज घडामोडी घडत आहेत. आरक्षण (Maratha Aarkshan) मिळावे यासाठी काहींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी वेगवेगळे आंदोलन उभारले जात आहे. यात आता (Manmad) मनमाड बाजार समितीच्या सभापतींनी आरक्षणासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Tajya Batmya)

मराठा आरक्षण मिळावे यासाठीची मागणी जोर धरू लागली आहे. याकरिता मराठा समाज पुन्हा एकदा एकवटला असून आंदोलन उभारले आहे. यातच मनमाड बाजार समितीचे सभापती माजी आमदार संजय पवार यांनी आपल्या सभापती व राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देत असल्याचे घोषित केले. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणाला विरोध केल्याने मराठा समाजामध्ये मोठा असंतोष पसरलेला असतांना त्याबाबत विचारणा होऊ लागली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या सोबत राहणे गरजेचे असल्याने आपल्या पदांचा राजीनामा देत असल्याचे संजय पवार यांनी स्पष्ट केले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काही दिवसा पुर्वीच लासलगाव मधिल लासलगाव बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनीही मराठा आरक्षण प्रश्नी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिलेला होता. यानंतर अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एक मोठा धक्का बसला असून त्यांचे समर्थक व माजी आमदार संजय पवार यांनी राजीनामा दिला आहे. मनमाड बाजार समितीत पुढील सभापती निवडीच्या वेळी काय निर्णय घ्यायचा याचा विचार करु असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : श्रीनिवास पवार बारामती मतमोजणी केंद्रावर दाखल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT