Mohan Bhagwat Saam TV
महाराष्ट्र

Mohan Bhagwat: 'वर्षभरापासून मणिपूर शांततेच्या प्रतिक्षेत', RSS सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य

Nagpur News: नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग 2 याचा समारोप पार पडला. यावेळी सुरुवातीला स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिक सादर केले. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते असं म्हणाले आहेत.

Satish Kengar

पराग ढोबळे, साम टीव्ही, नागपूर प्रतिनिधी

समाजात कलह चालत नाही. वर्षभरापासून मणिपूर शांततेच्या प्रतिक्षेत अहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रमुख मोहन भागवत म्हणाले आहेत. नागपुरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता विकास वर्ग 2 याचा समारोप पार पडला.

रेशीम बागच्या मैदानावर हा समारंभ कार्यक्रम झाला. यावेळी देशभरातून आलेले 936 कार्यकर्ते या वर्गात सहभागी झाले होते. यावेळी सुरुवातीला स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिक सादर केले. त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशभरातून आलेल्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ते असं म्हणाले आहेत.

या संघ शिक्षा वर्गाला दरवर्षी देशभरातील ख्यातनाम व्यक्तीना बोलावण्यात येते. यावेळी समारोपीय कार्यक्रमाला श्री क्षेत्र गोदावरी धामचे महंत रामगिरी महाराज यांच्यासह वैज्ञानिक डॉ. कृष्णा आला, उद्योजक प्रनुल जिंदाल, नाना पाटेकर यांचे चिरंजीव मल्हार पाटेकर नाम फाउंडेशनचे कार्यकारी अधिकारी गणेश थोरात. यांच्यासह सर्वच लक्ष वेधून घेणारे अंबानी यांचे जावई आनंद पिरामल यांचाही समावेश होता.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोहन भागवत म्हणाले आहेत की, ''घरातील महिला दारू पिते आणि कार चालवून लोकांना चिरडते. आपली संस्कृती कुठे आहे? म्हणून समाजात पिढीजात चालणारे धर्म संस्कार पुढे घेऊन जाणं आवश्यक आहे.'' ते म्हणाले, पुन्हा सरकार एनडीएचे आले आहे. गेल्या 10 वर्षात भरपूर कार्य झाले. आर्थिक वाढ, देशाची प्रतिष्ठा वाढली, कला विज्ञान संस्कृतीत आपण पुढे चाललो आहे.

लोकसभा निवडणुकीबाबत मोहन भागवत म्हणाले की, ही एकमत निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. संसदेत कोणत्याही प्रश्नाच्या दोन्ही बाजू पुढे याव्यात अशी व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान लोक ज्या प्रकारे एकमेकांवर टीका करतात, तंत्रज्ञानाचा गैरवापर करतात आणि असत्य पसरवतात ते योग्य नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : सोन्याच्या दरात होणार विक्रमी घट! कधी विकत घ्यायचं सोनं; वाचा तज्ज्ञ काय म्हणतायत?

Human Body Fact: हृदय शरीराच्या कोणत्या बाजूला असते?

Sillod Nagar Parishad : सिल्लोड नगरपालिका मतदार यादी वादात; अनेक मतदारांची नावे अन्य वॉर्डात गेल्याचा आरोप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चालवला ट्रक पाहा VIDEO

Bile duct cancer: पित्तवाहिन्यांचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीर देतं 'हे' संकेत; वेळीच निदान वाचवेल तुमचा जीव

SCROLL FOR NEXT