Narayan Rane : नारायण राणेंनी लोकसभा जिंकली, तरीही मोदींच्या मंत्रिमंडळातून डच्चू; काय आहे नेमके कारण?

Narayan Rane Latest News : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे ५० हजारांच्या मताधिक्याने जिंकले. नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केला.
नारायण राणेंनी लोकसभा जिंकली, तरीही मोदींच्या मंत्रिमंडळातून डच्चू; काय आहेत नेमके कारणे?
Narayan Rane NewsSaam TV

मुंबई : लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत नरेंद्र मोदी यांच्यासहित ७२ मंत्र्यांनी शपथ घेतली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला. तरीही दुसरीकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. लोकसभेची जागा जिंकूनही नारायण राणेंना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. मोदींच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

नारायणे राणेंना भाजपच्या कोट्यातून राज्यसभा मिळाली. त्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळात अडीच वर्ष लघू,सुक्ष्म उद्योग खात्याचं मंत्रिपद भूषवलं. यंदाही लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर नारायण राणे यांना मंत्रिपदाची आशा होती. मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये राणे यांनी लघू,सुक्ष्म उद्योग खाते सांभाळले.

नारायण राणेंनी लोकसभा जिंकली, तरीही मोदींच्या मंत्रिमंडळातून डच्चू; काय आहेत नेमके कारणे?
Maharashtra Politics: मविआ 180 जागा जिंकणार? महाविकास आघाडी लागली विधानसभेच्या तयारीला

तिसऱ्या टर्ममध्ये भाजपने राणे यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी गळ घातली. त्यानंतर यंदा राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढली. या मतदारसंघात नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचा पराभव केला.

राणे यांनी लोकसभेत जिंकण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली होती. राणे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली. राज ठाकरेंची सभा नारायण राणे यांच्या पथ्य्यावर पडली. राणे यांचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ५० हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले.

नारायण राणेंनी लोकसभा जिंकली, तरीही मोदींच्या मंत्रिमंडळातून डच्चू; काय आहेत नेमके कारणे?
Modi 3 Cabinet Portfolio: एनडीए सरकारचं खातेवाटप: महाराष्ट्रातील ६ मंत्र्यांना कोणती खाती मिळाली? जाणून घ्या

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, राणे यांनी लोकसभा जिंकूनही केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं. राणे यांच्या खात्यातून जास्त लघू उद्योजक तयार व्हावेत, असं उद्धिष्ट होते. मात्र, राणे त्यांच्या खात्यातवर फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाच्या यादीतून वगळण्यात आलं, असं भाजपच्या गोटात बोलले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com