Maharashtra Politics: मविआ 180 जागा जिंकणार? महाविकास आघाडी लागली विधानसभेच्या तयारीला

Maharashtra Assembly Election: मविआनं विधानसभेची निवडणूक एकत्रच लढणार आहे. त्यासाठी त्यांनी बैठकांचा सपाटा लावला असून तब्बल 180 जागा जिंकण्याचा निर्धार केलाय. उद्धव ठाकरेंनीही आपल्या खासदार-आमदार-पदाधिका-यांची बैठक घेऊन कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
मविआ 180 जागा जिंकणार? महाविकास आघाडी लागली विधानसभेच्या तयारीला
Maha Vikas Aghadi Saam Tv

लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळवणाऱ्या मविआनं आता विधानसभेवर झेंडा फडकवण्याची जोरदार तयारी सुरू केलीय. त्यासाठी मविआच्या तिन्ही मित्रपक्षांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावलाय. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख आणि मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात उद्धव ठाकरेंनी कामाला लागण्याचे आदेश दिले.

उद्धव ठाकरेंच्या सूचना

  • विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागा.

  • जागावाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल.

  • एकही मतदारसंघ सोडू नका.

शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत जोमानं काम करण्याच्याही सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

मविआ 180 जागा जिंकणार? महाविकास आघाडी लागली विधानसभेच्या तयारीला
Lok Sabha Speaker Post: मंत्रिपदापेक्षा लोकसभेच्या अध्यक्षपदावरून रस्सीखेच! भाजप तडजोड करायला तयार नाही? काय आहे कारण?

केंद्रात भाजपला बहुमतापासून रोखण्यात मविआचा मोठा वाटा आहे. कारण मविआनं महाराष्ट्रात तब्बल 30 जागा जिंकल्या. याच विजयाच्या जोरावर आता मविआ विधानसभेतही 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. मविआनं जे लोकसभा मतदारसंघ जिंकले आहेत. त्यातल्या तब्बल 164 विधानसभा मतदारसंघांमध्ये मविआ आघाडीवर असल्याचं पुढं आलंय.

मविआ 180 जागा जिंकणार?

288 विधानसभा मतदारसंघापैकी 164 मतदारसंघामध्ये मविआ आघाडीवर आहे. तर 12 विधानसभा मतदारसंघात अगदी थोड्या फरकाने मविआ पिछाडीवर आहे. विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघापैकी 43 जागांवर मविआ आघाडीवर पुढे आहे. मात्र कोकणातील 39 पैकी 27 मतदारसंघांमध्ये महायुतीला आघाडी असून 12 मतदारसंघांमध्ये मविआ पुढे आहे.

मविआ 180 जागा जिंकणार? महाविकास आघाडी लागली विधानसभेच्या तयारीला
PM Modi Cabinet Formation: रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांची खाती ठरली! नेमकी नवी जबाबदारी आता काय? वाचा सविस्तर

मविआनं लोकसभेसारखीच समीकरणं विधानसभेत जुळवली तर राज्यात सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान महायुतीसमोर असणार आहे. त्यामुळे लोकसभेसारखाच सत्तेचा संघर्ष विधानसभेत रंगणार यात शंका नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com