Bharat Kokate Quits Shiv Sena (UBT) to Join BJP Saam
महाराष्ट्र

राजकारणात नवा भूकंप! माणिकराव कोकाटेंच्या घरात भाजपचा झेंडा, लहान भावाकडून ठाकरेंना राम-राम

Bharat Kokate Quits Shiv Sena (UBT) to Join BJP: माणिकराव कोकाटेंचे बंधू भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार. ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत.

Bhagyashree Kamble

  • भारत कोकाटे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार.

  • शिवसेना ठाकरे गटाला धक्का.

  • सिन्नरमधील राजकीय वारे बदलले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे धाकटे बंधू भारत कोकाटे यांनी भाजप पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला 'जय महाराष्ट्र' करत पक्षाला रामराम केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. अखेर त्यांच्या राजीनाम्याच्या बातम्यांना पुर्णविराम मिळाला आहे. कोकाटे यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक आहेत. राज्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. अशातच सिन्नरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. सिन्नरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार आहे. भारत कोकाटे यांनी मशाल सोडून कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत कोकाटे सध्या सिन्नर येथील सोमठाणेच्या सरपंचपदी काम करीत आहेत. आतापर्यंत नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन आणि विशेष कार्यकारी सोसायटी अशा विविध पदांवर भारत कोकाटे यांनी काम केलं आहे. भारत कोकाटे यांनी २०२२ साली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात पक्षप्रवेश केला होता.

मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत कोकाटे यांनी भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. गेल्या अनेक महिन्यांपासून भारत कोकाटे शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा होती. लवकरच कोकाटे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करतील, अशी शक्यता होती. मात्र, आज कोकाटे भाजप पक्षात प्रवेश करणार, हे जाहीर झालं. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे सिन्नरमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump: तात्याचं आधार कार्ड बनलं; भरपत्रकार परिषदेत रोहित पवारांनी बनवलं कार्ड

Maharashtra Live News Update: चंद्रपुरात ६९ व्या धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त भव्य रॅली

बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश; साडेसहा लाखांच्या नोटा जप्त|VIDEO

Mumbai Crime: हॉटेलमध्ये बोलावून घेतलं, चर्चेच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार, अमेरिकेत PHD करणाऱ्या तरुणाचं भयंकर कृत्य

Gold Rate : सोन्याच्या दरात होणार विक्रमी घट! कधी विकत घ्यायचं सोनं; वाचा तज्ज्ञ काय म्हणतायत?

SCROLL FOR NEXT