
तमिळ अभिनेत्रीचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला.
टॅटू अन् DNA चाचणीवरून मृतदेहाची ओळख पटली.
अभिनेत्रीच्या पतीनं खुनाची कबुली दिली.
तमिळ अभिनेत्री संध्याचा संशयास्पद मृतदेह आढळला. शरीराचे तुकडे करून टाकण्यात आले होते. टॅटूवरून संध्याच्या मृतदेहाची ओळख पटली. जानेवारी २०१९ साली चेन्नईच्या पल्लीकरणाई डंप यार्डमध्ये एका व्यक्तीला पॉलिथिन सापडली. यातून मानवी बोटं बाहेर आली होती. पोलिसांना याबाबतीत माहिती देण्यात आली. पोलिसांनी पिशवी उघडली. त्यात महिलेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता. तर, अड्यार नदी परिसरातही महिलेच्या मृतदेहाचे काही अवयव सापडले.
मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलीस उपायुक्त मुथुस्वामी यांनी पथक तयार केले. पोलिसांनी १२ हजार टन कचरा तपासला. मृतदेहाचे अवयव सापडले. मात्र, डोके आणि डावा हात सापडला नाही. यानंतर मृतदेहाचे तुकडे गोळा करून पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे धारदार शस्त्राने केले असल्याची माहिती समोर आली.
यानंतर पोलिसांनी राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता महिलांच्या तक्रारी तपासल्या. परंतु महिलेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मृतदेहाच्या उजव्या हातावर दोन टॅटू होते. या टॅटूच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला.
त्यावेळी तुतीकोरिन पोलीस ठाण्यात एका महिलेनं तक्रार दाखल केली होती. मुलगी संध्या २० ते २५ दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती संध्याच्या आईनं दिली होती.
पोलिसांनी संध्याच्या आईला शरीराचे अवयव दाखवले. टॅटूवरून महिलेनं मुलीला ओळखले. नंतर डीएनए चाचणी करण्यात आली. तेव्हा हा मृतदेह संध्याचा असल्याचं सिद्ध झालं. संध्या पती बालकृष्णन आणि दोन मुलांसोबत राहत होती. चेन्नईच्या जाफरखानपेट येथे संध्या परिवारासोबत वास्तव्यास होती. पोलिसांनी बालकृष्णनला ताब्यात घेतलं. त्यानं पत्नीची हत्या केली असल्याचं कबुल केलं.
बालकृष्णनला संशय होता की, संध्याचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध आहेत. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडणे झाली. घटनेच्या दिवशी रागाच्या भरात त्यानं संध्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून संपवलं. नंतर मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरून फेकून दिलं. या घटनेनंतर पोलिसांनी संध्याच्या पतीला अटक केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.