'कपडे फाडले, नको तिथे स्पर्श करत सामूहिक बलात्काराचा प्रयत्न', कॉलेजच्या विद्यार्थिनीसोबत घडलं भयंकर

Physical Assault at South Asian University: दिल्लीतील साऊथ एशियन युनिव्हर्सिटीत विद्यार्थिनीवर चार जणांनी मिळून सामूहिक बलात्काराचा प्रयत्न केला.
Physical Assault at South Asian University
Physical Assault at South Asian UniversitySaam
Published On
Summary
  • युनिव्हर्सिटीत विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न.

  • तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

  • दिल्लीतील महिला सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालाय.

दिल्लीत गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच दिल्लीतील साऊथ एशियन युनिव्हर्सिटीमधून संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका विद्यार्थिनीने चार जणांनी मिळून सामुहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. याप्रकरणी सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर दिल्ली पुन्हा हादरली आहे.

पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत विद्यार्थिनीने म्हटले की, 'अत्याचार करणारे आरोपी हे ४ पुरूष होते. चारही आरोपींनी कपडे फाडले. नको तिथे स्पर्श केला. नंतर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न केला'. ज्या विद्यापीठात हा गुन्हा घडला, त्या विद्यापीठात बांधकाम सुरू होते. या घटनेनंतर विद्यार्थिनीने पीसीआर कॉलद्वारे पोलिसांना घटनेची माहिती दिली. सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास, पीडित तरूणीनं तक्रारीत संपूर्ण घटना सांगितली.

Physical Assault at South Asian University
शूटिंगदरम्यान ह्रदयविकाराचा झटका, प्रसिद्ध अभिनेत्याचे ५९ वर्षी निधन, सिनेसृष्टी शोक सागरात बुडाली

पोलिसांनी सांगितले की, एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सर्व बाजूने या प्रकरणाचा तपास सुरू आहे. चौकशी सुरू आहे. पीडितेचे सध्या समुपदेशन सुरू आहे. या घटनेमुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थितीत झाला आहे.

Physical Assault at South Asian University
कोल्हापुरात निवडणुकीचं बिगुल वाजलं! जिल्हा परिषदेच्या ६८ गटांसाठी आरक्षण जाहीर, वाचा सविस्तर

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विद्यापीठातील जवळजवळ प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थिनीच्या जबाबाच्या आधारे सर्व ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com