Agriculture Minister Manikrao Kokate  saam tv
महाराष्ट्र

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार का राहणार? शिक्षेच्या स्थगितीवर १ मार्चला फैसला

Manikrao Kokate Latest update : माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार का राहणार? याचा फैसला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात १ मार्च रोजी होणार आहे. त्यामुळे साऱ्यांचं लक्ष कोर्टाच्या निर्णयावर लागलं आहे.

Vishal Gangurde

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी झाली. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू न्यायालयाने बाजू ऐकून घेतली. त्यानंतर आज कोर्टातील मंत्री कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीचा निर्णय लांबणीवर गेला आहे. आता मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या स्थगितीवर १ मार्च रोजी फैसला होणार आहे.

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती मिळाल्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणी आज नाशिकला सुनावणी झाली. आज कोर्टात माणिकराव कोकोटे यांच्या २ वर्षांच्या शिक्षेला तात्पुरती स्थगितीवरील निर्णय लांबणीवर गेला आहे. कोर्टाने हा निर्णय १ मार्चपर्यंत राखून ठेवला आहे.

माणिकराव कोकाटे यांचे वकील म्हणाले, 'मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती द्यायची की नाही, यावर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. एक मार्च रोजी न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आजचा निर्णय राखून ठेवला आहे. कोर्टाने दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यास माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळणार आहे'.

'शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास माणिकराव कोकाटे यांच्यावर आमदार अपात्रतेची टांगती तलवार कायम राहणार आहे. 1 मार्च रोजी न्यायालय काय निर्णय देणार? यावर माणिकराव कोकाटे यांचं राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे, असे वकील भिडे पुढे म्हणाले.

दरम्यान, नाशिक सत्र न्यायालयात कोर्टाने कोकाटे यांच्या २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती न मिळाल्यास महागात पडू शकतं. कोर्टाच्या निर्णयाने माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदासहित आमदारकी देखील सोडावी लागेल. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. कोकोटे म्हणाले, नाशिक सत्र न्यायालयाचा निकाल लागण्याशिवाय काही नाही. न्यायालयीन बाब आहे. त्यामुळे संपल्यानंतर बघू'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kelfulachi Bhaji : आहारात केळफुलाची भाजी का असावी? 'हे' ६ फायदे आताच घ्या जाणून

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT