Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीसांनी दिले छगन भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत, भुजबळांचं मात्र मौन

Devendra Fadnavis Comment On Bhujbal : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छगन भुजबळांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिलेत.. मात्र फडणवीस नेमकं काय म्हणाले आहेत? आणि भुजबळांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा का रंगलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Chhagan Bhujbal
Devendra Fadnavis Comment On Bhujbal saam tv
Published On

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद नाकारल्यानं ते सध्या प्रचंड नाराज आहेत. त्यांची नाराजी भाजपमध्ये प्रवेश करुनच थांबणार असल्याचीही जोरदार चर्चा सुरु आहे. अजित पवारांनी मंत्रिपद न दिल्याने भुजबळ यांनी फडणवीसांची भेटही घेतली होती.याच पार्श्वभूमीवर सकाळ सन्मान पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत चर्चेचा विषय ठरली. कारण ठरलं मुलाखती दरम्यान फडणवीसांच्या हातात बालभारती इयत्ता पहिलीचं पुस्तक देण्यात आल्यानंतर त्यांनी केलेलं सूचक विधान.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी मात्र सूचकपणे 'मौन' बाळगलं आहे. भुजबळांच्या या सूचक मौनातून खरंतर त्यांनी फडणवीसांच्या विधानावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. त्यामुळं ते देखील फडणवीसांच्या विधानाशी सहमत आहेत का? ओबीसींचं पाठबळ असेलेले भुजबळ भाजपमध्ये कधी जाणार? आणि याबाबत अजित पवारांची काय भूमिका असणार ? आणि खरोखरच छगन भुजबळ कमळ बघणार का ? याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com