Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji Nagar Saam Tv
महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Nagar: पदवी नसतानाही 5 वर्षे आरोग्य विभागात कार्यरत; सिल्लोड येथील मुन्नाभाईवर गुन्हा दाखल

डॉ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhaji Nagar News : कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसतानाही तब्बल पाच वर्षे आरोग्य विभागात एक तरुण तालुका आरोग्य अधिकारी म्हणून काम करीत असल्याचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये समोर आलंय. डॉक्टर नसतानाही रुग्णांची तपासणी करून उपचारही केले. आरोग्य विभागाने कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हा तोतया डॉक्टर समोर आलाय. (Latest Marathi News)

मोहसिन खान शेरखान पठाण असं त्याचं नाव आहे. त्याच्यावर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभयकुमार धानोरकर यांनी याप्रकरणी पोलिसांकडे (Police) फिर्याद दिली. मोहसिन खान हा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात तालुका आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होता.

प्राथमिक माहितीनुसार, त्याची कंत्राटी पद्धतीने दोन वेळा नियुक्ती झाली. पहिली नियुक्ती २०१९ मध्ये, तर दुसरी नियुक्ती २०२२ मध्ये झाली. गेली पाच वर्षे तो कार्यरत होता. या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता 'बीएएमएस' उत्तीर्ण असणे अपेक्षित आहे. त्यासाठी मोहसिन खान याने तसे पदवीचे प्रमाणपत्रही सादर केले. (Crime News)

मात्र, तपासणीत ते प्रमाणपत्रच बनावट असल्याचे सिद्ध झाले. सिटीचौक पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होताच तपास अधिकारी उपनिरीक्षक उद्धव हाके त्याच्या शोधासाठी रवाना झाले. त्याच्या मूळ गावीदेखील शोध घेतला.

आपला बनाव उघडकीस आल्याचे कळताच तो पसार झाला. त्याचा शोध सुरू असून लवकरच अटक केली जाईल, असे हाके यांनी सांगितले. मात्र, ५ वर्षे एका तोतया डॉक्टरने (Doctor) प्रशासनाच्या सेवेत आरोग्य अधिकारी म्हणून काम केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिस करणार बंद

Sanjay Raut News: एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करण्यास देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचा विरोध होता; संजय राऊतांचा खळबळजनक दावा!

Fruits In Summer: उन्हाळ्यात खा ही ५ फळे, शरीराला मिळेल थंडावा

Pune News: भयंकर! पुण्यात मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला उडवलं, तरुण-तरुणी हवेत उडाले; जागेवरच मृत्यू

Solapur Crime News: दुहेरी हत्याकांडाने माळशिरस हादरले; दिवसाढवळ्या चाकूने भोसकून दोघांची हत्या

SCROLL FOR NEXT