Today's Marathi News Live: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचं आंदोलन

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (19 may 2024) : देश-विदेश राज्यातील प्रत्येक घडामोडी, लोकसभा निवडणूक लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर
Maharashtra's Live News in Marathi By Saam TV
19 May 2024 Latest Updates PM Narendra Modi, raj thackeray , uddhav thackeray Saam TV

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचं आंदोलन

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजप चे आंदोलन

"त्या" अल्पवयीन तरुणाने ज्या हॉटेल मध्ये पार्टी केली होती त्या हॉटेल बाहेर आंदोलन

अल्पवयीन मुलांना मद्य सेवा पुरवली कशी याचा जाभ विचारण्यासाठी भाजप चे आंदोलन

नवी मुंबईत प्रवेश बंदी या वाहनांना प्रवेश बंदी,  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

जड अवजड, मालवाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना

नवी मुंबईत प्रवेश बंदी 

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने प्रशासनाचा निर्णय

पुणे, कोकण, गोवा, बाजूकडून येणाऱ्या वाहनाचा मुंबई व गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांनी

नवी मुंबई पोलीस आयुक्तालया मार्फत वाहतूक नियंत्रण अधिसूचना

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सर्व प्रकारच्या जड अवजड, मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना शहराचे सर्व मार्गावरून मार्गस्थ होण्यास, प्रवेश करण्यास आणि वाहने उभी (पार्क) करण्यास पूर्णत: बंदी

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या दिशेने प्रवास करू नये, प्रशासनाचे आव्हान

पुण्यात बर्निंग बसचा थरार; आगीमुळे मोठी वाहतूक कोंडी

पुण्यात बरनिंग बस चा थरार

पुण्यात पी एम पी एल बस ला आग

पुण्यातील खडकवासला धरण परिसरात पीएमपीएमएल च्या बसला आग लागली

आगीचे कारण नेमके स्पष्ट होऊ शकलेले नाही

आज सुट्टी असल्याने खडकवासला धरण परिसरात मोठी गर्दी

बस ला लगेलेल्या आगीमुळे मोठी वाहतूक कोंडी

बारावीचा निकाल येत्या दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता

इयत्ता दहावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात लागण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच अधिकृत माहिती दिली जाणार

बारावीचा निकाल मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर होण्याची शक्यता

निकाल तयार करण्याचे काम अजूनही सुरू

या वर्षी रायगडावर साजरा होणार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

6 जून होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पुण्यात राज्यव्यापी बैठक

संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीने बोलावली बैठक

बैठकीला संयोगिताराजे छत्रपती,शहाजीराजे छत्रपती यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि शिवभक्त उपस्थित

350 वा शिवराज्याभिषेक सोहळा दिमागदार करण्याचा बैठकीत निर्धार

अवकाळी पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली

रत्नागिरी - मुंबई - गोवा महामार्गावर अवकाळी पावसामुळे वाहतूकीला अडथळा

पावसामुळे महामार्गावरील निवळी घाटात रस्त्यावर पाणी

महामार्गावर चौपदरीकरणाचं काम सध्या सुरु

महामार्गावर पाणी आणि चिखल यामुळे वाहतूकीला अडथळा

महामार्गावरुन जाताना वाहन धारकांना करावी लागतेय कसरत

पावसामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली

पिंपरी चिंचवड शहरात आज पुन्हा वळवाच्या पावसाची हजेरी

पिंपरी चिंचवड शहरात आज संध्याकाळी पुन्हा एकदा दमदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाच्या रिमझिम सरी आज पिंपरी चिंचवड शहरात पडल्या आहेत. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उन्हाळ्याच्या उष्णतेपासून पिंपरी चिंचवडकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

२ जणांचा जीव घेणाऱ्या "त्या" अल्पवयीन तरुणाला तात्काळ जामीन

पुण्यात भरधाव वेगाने गाडी चालवत "त्या" अपलवयीन तरुणाने दोन जणांचा घेतला होता जीव

पुण्यातील कल्याणीनगर भागात बेदरकारपणे, अती-वेगात गाडी ने धडक देऊन २ जणांना उडवले होते

याप्रकरणी पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला होता

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सुट्टीच्या कोर्टात हजर केले होते

एफआयआर मधील सर्व कलम जामीनपात्र असल्यामुळे काही अटींवर त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे

बीडच्या नांदूरघाट येथील दगडफेक प्रकरणी 321 जणांवर गुन्हा दाखल

बीडच्या केज तालुक्यातील नांदूरघाट येथील दगडफेक प्रकरणी आता पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. आतापर्यंत 3 गुन्हे दाखल झाले असून तब्बल 321 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सोशल मीडियावरील पोस्टने हा वाद वाढला होता.

संजय राऊत यांच्या अडचणी पुन्हा वाढणार; निवडणूक आयोग, पोलीस ठाण्यात तक्रार

संजय राऊत यांच्या अडचणी पुन्हा वाढणार

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आणि मुंबईच्या पोलीस ठाण्यात संजय राऊत यांच्या नावाची तक्रार

राज्यात आणि देशात जातीय तेड निर्माण करत असल्याचा शिवसेनेचा आरोप

मुंबईतल्या ३७ मशिदीतून फतवे काढले जात आहेत, बॅनर लावले जात आहेत, UBT ला सपोर्ट केला जातोय

जेजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

किरण पावसकर पत्रकार परिषदेत आरोप

भाजपच्या मुलुंड कार्यालय तोडफोड प्रकरण, शिवसैनिकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

शिवसैनिकांना करण्यात आलं कोर्टात हजर

एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर शिवसैनिकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

भाजप कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना झाली होती अटक

कोर्टाने न्यायालयीन कोठडी मंजूर करताच पाचही आरोपींकडून जामिनासाठी अर्ज

21 मे ला होणार सुनावणी

पुण्यातील वानवडी भागातील सरफावर दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना अटक

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

अवघ्या १२ तासात गुन्हे शाखेने घेतलं ७ जणांना ताब्यात

७ आरोपींकडून २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुण्यातील वारकरी मळा या ठिकाणी असलेल्या बी जी एफ ज्वेलर्स या सराफावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता

यावेळी दरोडेखोरांनी सोन्याचे आणि चांदीचे ३०० ते ४०० ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले होते

अकोल्यात ट्रक आणि कारचा भीषण अपघात

अकोल्यातल्या अकोला पातुर रस्त्यावर ट्रक आणि कारचा आज भीषण अपघात झालाय. या अपघात 3 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने अकोल्याच्या शासकिय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले आहे. अकोला जिल्ह्यातील पातुर-अकोला रस्त्यावरील चिखलगाव गावाजवळ आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जनावरांचं कुटार वाहून नेणारा ट्रक रॉन्ग साईंडनं आलेल्यामूळ ट्रक आणि कारचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघातानंतर ट्रक रस्त्यावर पलटी झाला असून कारचा अक्षरशा चुराळा झालाय. या घटनेची माहिती मिळताच पातुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अपघाती वाहनांना बाजूला करून वाहतुकीचा मार्ग सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

बीडच्या नित्रुड येथे तिहेरी अपघातात; 1 ठार तर 3 जण जखमी

बीडच्या माजलगाव तेलगाव महामार्गावरील नित्रुड येथे तिहेरी अपघात झालाय. यामध्ये 1 जण ठार तर 3 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. तेलगावकडून माजलगावकडे जाणाऱ्या बैलगाडी आणि दुचाकीला 4 चाकी वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील रतन कांबळे वय 45 यांना डोक्याला मार लागल्याने हे जागीच ठार झाले आहेत. तर त्यांच्यासोबत असलेल्या मनीषा सुरेश वाघमारे वय 40, लक्ष्मी लखन कदम वय 30 व कार्तिक लखन कदम वय 3 हे गंभीर जखमी झाले आहेत. तर बैलगाडीला धडक बसल्याने दोन्ही बैलाचे पाय मोडले आहेत. दरम्यान याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Monsoon : सायंकाळपर्यंत अंदमानमध्ये दाखल होणार मॉन्सून

आज सायंकाळपर्यंत मॉन्सून अंदमानमध्ये दाखल होणार आहे. 31 मे रोजी भारताचे मुख्य भूमी म्हणजेच केरळमध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. जूनमधील पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. निकोबार बेटावर गेल्या २४ तासात चांगला पाऊस झालाय. अंदमान समुद्र तसेच बंगालच्या खाडीमध्ये मॉन्सून आज दाखल होण्याचा अंदाज आहे.

Ratnagiri News: चिपळूण तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, नद्या नाले तुडूंब

मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. कोकणातील अनेक ठिकाणी चक्रीवादळ आणि पाऊस धुव्वाधार पाऊस कोसळत आहेत. चिपळूणमधील सह्याद्री भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाचे व्हिडिओ समोर येत आहेत. अर्धा तास मुसळधार पडलेल्या पावसाने अडरे, अनारी परिसरातल्या नद्या प्रवाहित झाल्या आहेत. मे महिन्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना सह्याद्री भागातील गावांमध्ये पडलेला मुसळधार पाउस चर्चेचा विषय बनला आहे.

मुसळधार पावसामुळे नद्या प्रवाहित झाल्यामुळे गावातील पुलाचे काम करण्यासाठी आणलेले साहित्य देखील या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेलय. जुलैमध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो, त्या प्रमाणात पाऊस इथल्या ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवला. त्यामुळे इथल्या शेताचे आणि तुडुंब वाहणाऱ्या नद्यांचे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.

Kalyan News : कल्याणमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक आयोग सज्ज

कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 28 उमेदवार असले तरी खरी लढत शिवसेना शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात आहे .ही लढत एकदमच एकतर्फी होते की चुरशीची होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .

उद्या या उमेदवारांची परीक्षा आहे. या परीक्षेचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 20 लाख 18 हजार 958 मतदार ,आहेत तर एकूण 1960 मतदान केंद्र आहेत .निवडणुकीत विविध शासकीय यंत्रणांची 11 हजार कर्मचारी काम करत आहेत तर कायदा व्यवस्था राखण्यासाठी देशांच्या देखील सज्ज झाली असून 200 पोलीस अधिकारी 1800 पोलीस कर्मचारी 950 होमगार्ड पाच एस आर पी एफ सी ए पी एस च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील 1960 मतदान केंद्रांवर निवडणुकीचे साहित्य रवाना झाले या मतदान केंद्रांवर उद्याची तयारी सुरू झाली आहे . उद्या सकाळी 7 वाजता मतदानास सुरुवात होईल . मतदारांना कोणत्याही अडचणी येऊ नये त्याकरता निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर चोख व्यवस्था ठेवली आहे त्याचप्रमाणे मतदाराला आपलं नाव शोधता यावे याकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर अल्फाबेटिकल रोल लोकेटर ठेवण्यात आले आहे.

या माध्यमातून मतदार आपले नाव शोधू शकेल त्याला मतदान करणे सोपे जाईल . त्याचप्रमाणे महिलांना मतदानात प्रोत्साहन करण्यासाठी कल्याण लोकसभा अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक पिंक सेंटर बनवण्यात आले यामध्ये सर्व महिला अधिकारी कर्मचारी असणार आहेत तर सुरक्षेची जबाबदारी देखील महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे .

2019 साली कल्याण लोकसभा मतदारसंघात 45.31% मतदान झालं होतं यंदा ही मतदानाची आकडेवारी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते . नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करत लोकशाहीचा हक्क बजावावा, असा आवाहन देखील निवडणुका अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

Dharashiv News: अवकाळीमुळे भाजीपाल्याचे दर वाढले, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पाऊस व उन्हाचा फटका बसल्याने भाजी मंडईसह आठवडी बाजारातही भाजीपाल्याची आवक 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. वांगी,टॉमेटो,बीट व भेंडीच्या दरात फारसा फरक पडलेला नसला तरी पालेभाज्यांचे दर माञ कडाडले आहेत.

मेथीची एक जुडी 30 रुपयांना मिळत आहे. यासोबतच पालक,चुका सेपु, हिरव्या पानांच्या पालेभाज्यांचे दर देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे आठवड्याचे बजट कोलमडले आहे.

Dadar News : दादरमधील रेस्टॉरंट बॉम्बने उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ

मुंबईतील एक मोठी बातमी समोर आली आहे. दादर येथील एका रेस्टॉरंटला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. शनिवारी रात्री एका व्यक्तीने पोलिसांना कॉल ही माहिती दिली आहे. बेस्ट बसमधून प्रवास करताना दोन अज्ञात व्यक्तींचे संभाषण ऐकल्यानंतर त्याने पोलिसांना त्यांच्यात हे संभाषण सुरू असल्याचा दावा या व्यक्तीने केला आहे.

या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून सतर्कता म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. दोघे प्रवाशी हिंदीत "बॅगेत बॉम्ब असून, दादरचं मॅकडॉनल्ड उडवणार", असल्याच बोलत असल्याचा कॉलरने दावा केला आहे. दरम्यान, मॅकडॉनल्डची तपासणी केली असता कोणतीही संशयित वस्तू आढळून आली नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Ajit Pawar Baramati : बारामतीत अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आले आहेत. अजितदादांनी पहाटे ६ वाजल्यापासून बारामती शहर व परिसरातील विविध विकासकामांची पाहणी केली.

त्यानंतर अजितदादांनी आपल्या सहयोग या निवासस्थानी नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीला सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या धामधुमीनंतर प्रथमच अजितदादा बारामतीत आले आहेत. अनेकांनी त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.

Raosaheb Danve : शरद पवार, उद्धव ठाकरेंकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही, रावसाहेब दानवेंचं विधान

लोकसभा निवडणुकीत भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील. महाराष्ट्रातही महायुतीला ४५ हून अधिक जागा मिळतील. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडे पाठिंबा मागण्याची वेळ येणार नाही, असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.

jayant Patil News : जयंत पाटील ठरले 'शतकवीर', लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने घेतल्या १०० सभा

मुंबई :- लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील पाचवा आणि अंतिम टप्प्याचा प्रचार आज संपला. या संपूर्ण प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तब्बल १०० सभा घेत शतकवीर ठरले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरून ही माहिती देण्यात आली आहे. याबाबत पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यात दिनांक ८ एप्रिल २०२४पासून (लोकसभा प्रचार सुरू झाल्यापासून) ते आजपर्यंतच्या सभांचे ठिकाण तारखेसह देण्यात आले आहे.

'लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज महाराष्ट्राच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्याच्या प्रचाराच्या शेवटी शंभर सभा पूर्ण केल्या. या शंभर सभा आदरणीय पवार साहेबांचे अस्सल नेतृत्व, त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आणि त्यांच्या प्रती असलेल्या निष्ठेला समर्पित. कितीही संकटे आली तरी राष्ट्रवादी काँग्रेस परिवार अभेद्य, अविचल राहून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करेल.' अशी भावना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिस करणार बंद

कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिस बंद करण्याच्या तयारीत

शवविच्छेदन अहवालात विशालवर विषप्रयोग न झाल्याचे उघड

१ मे रोजी झाला होता विशालचा मृत्यू

मृत्यूपूर्वी विशालाचा पोलिसांनी नोंदवला होता जबाब

जबाबात मोबाईल चोरांचा पाठलाग करत असताना सायन-माटुंगा रेल्वे स्थानका दरम्यान गर्दुल्ल्यांनी हल्ला केल्याचा होता विशालाचा दावा

गर्दुल्ल्यांनी इंजेक्शन दिल्याचा विशालने केला होता आरोप

तपासात सगळी कहाणी बनाव असल्याच झालं उघड

Pune Crime News: गुन्हेगारांचं सोशल मीडियावर पुन्हा एकदा उदात्तीकरण; गुंड गजानन मारणेचा व्हिडिओ व्हायरल

गुन्हेगारांचं सोशल मीडियावर पुन्हा एकदा उदात्तीकरण

गुंड गजानन मारणे चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

नंबर प्लेट नसलेल्या, मोठ्या आवाजाच्या गाड्या टोळक्याने फिरवण्याचा व्हिडिओ आला समोर

गजानन मारणेच्या समर्थकाने व्हिडिओ केला सोशल मीडियावर प्रसारित

मागील काही दिवसांपूर्वी सर्व गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तालयात एकत्रित करून घालून देण्यात आले होते निर्बंध

सोशल मीडियावर गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्हिडिओ टाकण्यात केली होती मनाई

तरी देखील मोठ्या प्रमाणात असे व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवले जात आहेत

Air India Flight : मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनला भीषण आग

एक मोठी बातमी समोर आली आहे. बंगळुरू येथून कोचीच्या दिशेने निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या इंजिनला भीषण आग लागली. या विमानाचं आपत्कालिन लँडिग करण्यात आलं आहे. विमानातून १७९ प्रवाशी प्रवास करीत होते. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

Pandharpur News: मोहिनी एकादशीनिमित्त हजारो भाविक पंढरपूरमध्ये दाखल

वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त पंढरीत हजारो भाविकांची गर्दी झाली आहे. विठ्ठल रुक्मिणी मुख दर्शनासाठी दर्शनासाठी जवळपास ५ ते ६ तास लागत आहेत. चंद्रभागा नदी, नौका विहार, महाद्वार, प्रदक्षिणामार्ग, पश्चिमद्वार, सह विठुरायाची पंढरी नगरी गजबजून गेली आहे. आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली आहे. सध्या मंदिर जिर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येणार नाही मात्र २ जून पासून श्री विठ्ठलाचे व रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे.

Monsoon Weather News: मान्सून आज अंदमानात दाखल होणार, महाराष्ट्रात तुफान पाऊस कोसळणार

मान्सून आज अंदमानात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. अंदमानानंतर वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला असून पुढील ५ दिवस मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 Bhandara News: तुमसरात नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; लेडी सिंघम ॲक्शन मोडवर

तुमसर शहरात वाहतुकीचे नियमाचे उल्लंघन व अपघाताला समोर जावे लागत असून त्यासाठी १४ ते २१ मे पर्यत वाहतूक मोहीम सप्ताह शहरात व परिसरात राबवत आहे. त्याकरिता सहाय्यक पोलीस अधीक्षक रस्मिता राव जातीने फेरफटका मारत आहे. तर त्यासंबंधित जनतेची कान उघडणी करण्यात येत आहे.

सहाय्यक पोलीस अधीक्षक रश्मिता राव यांच्याकडून १४ ते २१ मे पर्यंत वाहतूक जागरूकता मोहीम राबविण्यात येत आहे.त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पार मोडकडीस आली व पार्किंग व्यवस्था सडकेवर आली आहे.

त्यामुळे अनेकांना त्रास सहन करावे लागत आहे.त्याकरिता विशेष लक्ष देऊन व्यवस्थेत सुधारणा करण्याचा प्रयत्न पोलीस खात्याकडून केल्या जात आहे. त्यांचबरोबर हेल्मेट चे महत्व पटवून हेल्मेटच्या वापर करण्यास वाहनधारकांना सांगण्यात येत आहे

Washim News: कारंजा शहरात जबर चोरी, 72 हजाराचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार

वाशिमच्या कारंजा शहरातील यशोदा नगरमध्ये दोन घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ७२ हजारांच्या मुद्देमाल लंपास केलाय. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालय. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करताहेत. मात्र वाशीम जिल्ह्यात सद्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून रात्रीच्या गस्तीमध्ये पोलिसांनी वाढ करावी असे मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Lok Sabha Election 2024 : लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार शनिवारी थांबला आहे. आता सोमवारी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. यामध्ये मुंबईतील ६ मतदारसंघासह राज्यातील १३ मतदारसंघाचा समावेश आहे.त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.