Fruits In Summer: उन्हाळ्यात खा ही ५ फळे, शरीराला मिळेल थंडावा

Health Tips In Summer: उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे असते.या ऋतूत आरोग्याची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे. कडाक्याच्या उन्हात बाहेरून प्रवास केल्यानंतर शरीरात पाण्याची कमतरता भासते अशावेळी फळांचे सेवन करणे फायदेशीर आहे.
Health Tips
Fruits In SummerSaam Tv

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे असते.या ऋतूत आरोग्याची (Health) योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे. कडाक्याच्या उन्हात बाहेर प्रवास केल्यावर शरीरात पाण्याची कमतरता भासते अशावेळी फळांचे सेवन करणे फायदेशीर आहे.

Health Tips
Beetroot Dosa Recipe : सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा बीट डोसा; रंग पाहून लहान मुलं देखील ताव मारतील

उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून (dehydration) बचाव करण्यासाठी फळे खाणे महत्वाचे आहे. फळे खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन आरोग्य सुधारते.

उन्हाळ्यात कोणती फळे खावीत?

कलिंगड (Watermelon)

उन्हाळ्यात कलिंगडला सूपरफूड मानले जाते. कलिगंडमध्ये ९०% पाण्याचे प्रमाण असते. कलिंगड शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते. यामुळे उन्हाळ्यात कलिंगड ज्यूसचे सेवन करा.

सफरचंद (Apple)

उन्हाळ्यात सफरचंद खाल्ल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. सफरचंद हे शरीरातील उष्णती कमी करते.

Health Tips
Health Tips Water : तहान नसतानाही पाणी पिणे ठरू शकते आरोग्यासाठी घातक

काकडी (Cucumber)

उन्हाळ्याच्या सीझनमध्ये बाजारात काकडीला प्रचंड मागणी असते. काकडीमध्ये फायबर, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन ए आहे.काकडीत ९५ टक्के पाणी असते. यामुळे काकडीचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते.

संत्री (Orange)

उन्हाळ्यात संत्री खाणे खूप फायदेशीर आहे त्यात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असते यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत होते व शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com