
निरोगी आरोग्यासाठी तसेच शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित जास्तीत जास्त पाणी प्यावा असा सल्ला आपल्याला दिला जातो. शरीराला पाण्याची आवश्यकता असते. पण तुम्हाला माहित आहे का? अतिप्रमाणात पाणी पिणे आरोग्यासाठी (Health) घातक ठरू शकते.
शरीराच्या सर्व अवयवांचे कार्य सुरळीत होण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. पाणी (Water) हे शरीरासाठी आरोग्यदायी पेय मानले जाते. मात्र तहान लागली नसेल तरीही २-४ मिनिटांनी पाणी पित राहणे ही सवय आरोग्यासाठी वाईट आहे. पाणी हे शरीरातील अतिरिक्त विषारी घटक बाहेर टाकते. मात्र तहान लागली नसतानाही सतत पाणी पित राहणे ही सवय आरोग्यासाठी योग्य नाही.
आरोग्यतज्ज्ञांच्या माहितीनुसार, मूत्रपिंड हे दररोज सुमारे २०-२८ लिटर पाणी शुद्ध करते. मात्र अतिप्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरात हायपोनेट्रेमिया समस्या निर्माण होते. ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढते तसेच पेशींमध्ये सूज येणे, डोकेदुखी, मळमळ आणि उलट्या या सारख्या समस्या उद्भवतात.
पाणी पिण्याचे योग्य प्रमाण हे शरीराचे वजन, हवामान आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते. तहान न लागता पाणी पिण्याच्या सवयीला सायकोजेनिक पॉलीडिप्सिया म्हणतात. तहान न लागताही दर २-४ मिनिटांनी पाणी पित राहणे हे शरीरासाठी धोकादायक आहे. यानुसार दिवसभरात किमान आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.
डिस्क्लेमर
वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित अधिक माहितीसाठी वैद्यकीय सल्ला घ्या