Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime: सासरचा त्रास, जावयाचा गळफास;पत्नीच्या मैत्रिणीमुळे कुटूंब उद्ध्वस्त

Nashik Crime Son-In-Law Killed Himself: नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. सासरच्या कुटुंबीयांचा त्रास होत असल्याने एका व्यक्तीने आत्महत्या केल्या घटना घडलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

सासरच्या जाचाला कंटाळून सुनेने आत्महत्येच्या घटना पाहिल्या असतील. मात्र नाशिकमध्ये सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मात्र हे प्रकरण काय आहे? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

आजवर सासरच्या जाचाला कंटाळून सूनेने आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र नाशिकमध्ये चक्क पत्नी, सासू आणि सासऱ्यांच्या त्रासाला कंटाळून जावयानेच गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. यासंदर्भातील सुसाईड नोट हेमंत पवारांनी लिहून ठेवलीय, त्यामुळे गुन्ह्याची उकल झालीय.

हेमंत प्रभाकर पवार यांचं 13 वर्षांपूर्वी सुगंधा देवरे यांच्याशी लग्न झालं. त्यांना 10 वर्षांची मुलगी आहे. मात्र त्यांनी घरातील पंख्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. सासरच्या लोकांनी छळ केल्यामुळेच हेमंतने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. हेमंत पवारांच्या सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर आलीय.

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?

पत्नी सुगंधा पवार, सासरे हरी देवरे, सासू रत्ना देवरे, मेहुणी संध्या मांडवणे आणि पत्नीची मैत्रीण मोना जेऊघालेंचा जाच

सासू, सासरे, मेहुणी आणि पत्नीच्या मैत्रीणीमुळे घरात भांडण

सासरच्या सर्वांनी मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख

मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सेव्ह करून ठेवल्याचीही नोटमध्ये माहिती.

राज्यात 30 टक्के महिला घरगुती हिंसाचाराच्या बळी ठरल्या आहेत. मात्र नाशिकमध्ये सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाने आत्महत्या केल्याने चर्चांना उधाण आलंय.त्यामुळे घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी समुपदेशन करून अशा घटना रोखायला हव्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT