Nagpur crime news: Man kills friend with stone over love triangle : मैत्रीच्या नात्यातील विश्वासघात आणि प्रेमाच्या त्रिकोणातून नागपूरमध्ये हत्येची खळबळजनक घटना घडली आहे. एका मित्राने गर्लफ्रेंडसोबत का राहातो, म्हणून आपल्याच मित्राच दगडाने ठेचून हत्या केली. नागपूरच्या अग्रसेन चौकात रविवारी रात्री घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण नागपूरमध्ये खळबळ उडाली. शैलेश हिरालाल असं मृत तरूणाचे नाव आहे, तर आरोपीचे नाव अनुराग बोरकर असं आहे.
अनुराग बोरकरने आपला मित्र शैलेश हिरालाल याच्या डोक्यावर आणि छातीवर दगडाने वार करून त्याला रक्तबंबाळ केलं. होशंगाबादच्या कारागृहात सुरू झालेली मैत्री नागपुरात पाच-सहा वर्षे टिकली, पण अनुरागच्या प्रेयसी सोनू मरसकोल्हेच्या शैलेशसोबतच्या नात्याने अनुरागच्या मनात रागाची ठिणगी पेटवली. या रागातून अनुरागने शैलेशचा जीव घेतला. घटनेची माहिती मिळताच तहसील पोलिसांनी शैलेशला रुग्णालयात दाखल केलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी आरोपी अनुरागला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
नागपुरातील तहसील पोलीस स्टेशन हद्दीत अग्रसेन चौकात घडलेल्या या खूनाचा घटनेन एकच खळबळ उडाली. बाजारात एका मित्राने आपल्याच मित्राच्या डोक्यावर दगड मारून खून केल्याची घटना समोर आली. अनुराग बोरकर आणि शैलेश हिरालालची होशंगाबादची कारागृहात पादोघांची पहिली भेट झाली होती. तेव्हापासून दोघांमध्ये मैत्री होती. मागील 5 ते 6 वर्षा पासून हे दोघेही नागपुरात राहत होते. सोनू मरसकोल्हे ही अनुराग सबोत लिव्हइन मध्ये राहत होती. मात्र काही दिवसांपासू तीच शैलेशसोबत राहत असल्याने अनुरागला राग होता.
तोच राग मनात धरून अनुरागने शैलेशचा काटा काढला. रविवारी रात्री अग्रसेंन चौकात शैलेश हा अनुराग हे समोरासमोर आले. तेव्हा मनातील राग बाहेर काढत अनुरागने एक दगड शैलेशच्या छातीत आणि डोक्यावर मारून त्याला रक्तबंबाळ केलं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तातडीने धाव घेत शैलेशला रुग्णालयात दाखल केलं होत. मात्र डॉक्टरानी शैलेशला मृत घोषित केलं. पोलिसांनी हत्येचा तपास करत आरोपी अनुराग बोरकरला जेरबंद केलं. पुढील तपास सुरू केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.