Ahmednagar Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News: एकतर्फी प्रेमातून तरुणाची आत्महत्या, भावांनी मिळून मुलीच्या बापालाच संपवलं; अहमदनगर हादरले

Ahmednagar Police: याप्रकरणी सुपा पोलिसांनी (Supa Police) तीन अल्पवयीन मुलांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Priya More

सुशील थोरात, अहमदनगर

Ahmednagar News: अहमदनगरमध्ये गुन्हेगारीच्या (Ahmednagar Crime) घटना वाढत चालल्या आहेत. अशामध्ये गुरुवारी रात्री एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन मुलांनी डोक्यात कुऱ्हाड घालून या व्यक्तीची हत्या केली. या घटनेमुळे अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सुपा पोलिसांनी (Supa Police) तीन अल्पवयीन मुलांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. हत्या करणाऱ्या तिन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नारायणगव्हाण या ठिकाणी गुरुवारी रात्री एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. संतोष गायकवाड असं हत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. डोक्यामध्ये कुऱ्हाड घालून संतोष यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी संतोष गायकवाड यांची पत्नी सुरेखा गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हत्या झालेले संतोष गायकवाड यांच्या मुलीवर सिद्धांत भगवान दरेकर या तरुणाचे एकतर्फी प्रेम होते. या प्रेमातून गायकवाड आणि दरेकर कटुंबामध्ये वाद झाले होते. संतोष यांच्या मुलीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सिद्धांत दरेकरने गळाफास लावून आत्महत्या केली होती. तेव्हापासून दरेकर कुटुंब आणि गायकवाड कुटुंबात नेहमीच वाद होत होते.

याच कारणातून गुरुवारी रात्रीच्या सुमारास दरेकर कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलांनी संतोष गायकवाड यांची हत्या केली. या तिन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिन्ही अल्पवयीन मुलांसह खून करण्यास भाग पाडणाऱ्या भगवान नाना दरेकर, अजिंक्यतारा विष्णू दरेकर, विष्णु नाना दरेकर, नारायण नाना दरेकर, सोमनाथ नारायण दरेकर, हनुमंत नारायण दरेकर यांच्याविरोधात सूपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही मुलांमागे त्यांच्या कुटुंबातील सदस्य मास्टर माईंड असल्याने आरोपींना अटक करावी, अशी मागणी संतोष गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

SCROLL FOR NEXT