Devendra Fadnavis News: 'विरोधी पक्षांची बैठक म्हणजे कुटुंब बचाव बैठक'; देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका

Devendra Fadnavis News: 'विरोधकांची ही मोदी हटाव बैठक नाही. ही बैठक म्हणजे कुटुंब बचाव बैठक आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Devendra Fadnavis On Maharera
Devendra Fadnavis On Maharera Saam Tv
Published On

Devendra Fadnavis News: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात आज विरोधी पक्षांची बैठक पाटण्यात पार पडणार आहे. या बैठकीला देशभरातून विरोधी पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीवरून देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. 'विरोधकांची ही मोदी हटाव बैठक नाही. ही बैठक म्हणजे कुटुंब बचाव बैठक आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (Latest Marathi News)

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'विरोधी पक्षातील नेत्यांची मोदी हटाव बैठक नाही. ही बैठक म्हणजे विरोधी पक्षांची बैठक ही कुटुंब बचाव बैठक आहे. अशा प्रकारचे किती बैठका घेतल्या, तरी केंद्रात नरेंद्र मोदी हेच येणार आहे'.

'आता उद्धव ठाकरे हे मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत बैठकीत बसणार आहेत. जे आधी त्यांच्यावर टीका करत होते. आता ते काय बोलणार? कोव्हिड काळात ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांनी मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे, त्यांची चौकशी होणारच. त्यांना सोडता येणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

Devendra Fadnavis On Maharera
Rahul Gandhi On Modi Government: 'काँग्रेसची भारत जोडो, तर भाजप-आरएसएसची भारत तोडो विचारधारा', राहुल गांधीचा मोदी सरकारवर हल्लाबोल

देशातील योजनेविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, 'देशातील कोणत्याही व्यक्तींचा उपचारा अभावी मृत्यू होऊ नये. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आयुष्यमान भारत योजना सुरू केली आहे. या विमा योजनेत ॲापरेशनचा देखील समावेश असेल या योजनेमुळे राज्यातील कोणताही व्यक्ती उपचारा अभावी राहणार नाही. या योजनेचा महाराष्ट्र राज्य सरकारसोबत सहयोजना म्हणजे ज्योतीबा फुले आरोग्य योजना अशा या दोन्ही आरोग्य योजना एकत्र करून राज्यातील १२ करोड लोकांना उपयोगी पडेल असा. पाच लाखांचा आरोग्य विमा संरक्षण मिळेल'.

Devendra Fadnavis On Maharera
Narendra Modi News: वेळ नक्कीच बदलते! ३० वर्षांपूर्वी व्हाईट हाऊस बाहेर फोटो काढला, आज तिथूनच अमेरिकेला केलं संबोधित

'कधी कधी उपचारावेळी औषधांचा खर्च ही जास्त होत असतो. अशा वेळी रुग्णांना औषधांचा खर्च होऊ नये. यासाठी जनऔषधी केंद्र सुरू करणार आहोत. १ हजार पैक्षा जास्त ही केंद्र राज्यात सुरू करणार आहोत, अशी माहिती देखील फडणवीस यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com