Rahul Gandhi On Modi Government: 'काँग्रेसची भारत जोडो, तर भाजप-आरएसएसची भारत तोडो विचारधारा', राहुल गांधीचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Patna Opposition Parties Meeting : विरोधकांच्या बैठकीपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
Rahul Gandhi On Modi Government
Rahul Gandhi On Modi GovernmentSaam tv
Published On

Patna Opposition Unity Meeting : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2023) देशातील सर्वच विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. या निवडणुकीपूर्वी मोर्चेबांधणी करण्यासाठी पाटण्यामध्ये आज विरोधी पक्ष नेत्यांची महत्वाची बैठक (Patna Opposition Unity Meeting) होत आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या (Bihar CM Nitish Kumar) निवासस्थानी ही बैठक सुरु आहे. या बैठकीपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 'काँग्रेसची भारत जोडोची विचारधारा आहे. तर भाजप-आरएसएसची भारत तोडोची विचारधारा आहे', अशी टीका राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी केली.

Rahul Gandhi On Modi Government
Mumbai Blast Threat Call: मुंबई, पुण्याला स्फोटानं उडवण्याची धमकी, सकाळी सकाळी आलेल्या फोनमुळं खळबळ, यूपी कनेक्शन समोर

पाटणा येथील सदकत आश्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'भारतात विचारधारेची लढाई सुरु आहे. एकीकडे काँग्रेसची भारत जोडोची विचारधारा आणि दुसरीकडे भाजप आणि आरएसएसची भारत तोडोवाली विचारधारा आहे.' तसंच, 'काँग्रेस पक्षाचा डीएनए बिहारमध्ये आहे. म्हणूनच आज आपण बिहारमध्ये एकत्र आलो आहोत. बिहारचे लोक भारत जोडो यात्रेत माझ्यासोबत होते.', असे त्यांनी सांगितले.

Rahul Gandhi On Modi Government
BMC Covid Scam : २०० हून अधिक डॉक्टरांच्या बोगस नोंदी, कोट्यवधी उकळले; कोविड सेंटर घोटाळ्याची व्याप्ती वाढली

राहुल गांधी यांनी पुढे सांगितेल की, 'भाजप भारताला तोडण्याचं काम करत आहे. काँग्रेस पक्ष देशाला जोडण्याचे आणि प्रेम देण्याचे काम करत आहे. द्वेषाला द्वेष हे उत्तर कधीच होऊ शकणार नाही. द्वेषाला प्रेम हेच उत्तर असणार आहे.' आज सर्व विरोधी पक्षाचे नेते भाजपला हरवण्यासाठी एकत्र आले आहेत. भाजप फक्त दोन-तीन उद्योगपतींसाठी काम करते', अशी टीका त्यांनी केली आहे. तसंच, 'तेलंगणा, छत्तीसगढ, राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार येणार.', असा दावा त्यांनी केली आहे.

Rahul Gandhi On Modi Government
Darshana Pawar Death Case : मोबाईल बंद, विविध राज्यात भटकंती... दर्शना पवारचा मारेकरी पोलिसांच्या सापळ्यात कसा अडकला?

दरम्यान, पाटणामध्ये आज विरोधकांची महत्वपूर्ण बैठक (Patana Opposition Parties Meeting) सुरु आहे. मोदी सरकारविरोधात (Modi Government) आणि आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भातील (Loksabha Election 2024) रणनीती ठरवण्यासाठी विरोधकांची ही बैठक असणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांच्या पुढाकाराने पाटणामध्ये विरोधी पक्षांच्या एकतेची ही बैठक सुरु आहे. नितीश कुमार यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरु आहे.

या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, सपा प्रमुख अखिलेश यादव, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, अरविंद केजरीवाल, मेहबूबा मुफ्ती, दीपंकर भट्टाचार्य यांनी या बैठकीला उपस्थिती लावली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com