Jammu Kashmir News: जय जवान! ना'पाक' डाव उधळला; भारतीय जवानांनी काला जंगलात ५ दहशतवाद्यांना टिपून मारले

Terrorist Killed in Kupwara : भारतीय लष्कराच्या जवानांनी आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानचा नापाक डाव पुन्हा उधळून लावला.
Terrorist Killed in Kupwara/File Photo
Terrorist Killed in Kupwara/File PhotoSAAM TV
Published On

Terrorist Killed in Kupwara : भारतीय लष्कराच्या जवानांनी आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी पाकिस्तानचा नापाक डाव पुन्हा उधळून लावला. सुरक्षा दलाच्या जवानांनी कुपवाडामधील माछल सेक्टरमध्ये काला जंगलात ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. हे दहशतवादी पाकिस्तानच्या हद्दीतून भारताच्या सीमाभागात घुसखोरीचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी लष्कराच्या जवानांनी आणि पोलिसांनी ही कारवाई केली. (Latest Marathi News)

जम्मू-काश्मीर आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला भारतानं अनेकदा झापलं आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून जाहीरपणे ठणकावलं आहे. पण पाकिस्तान काही सुधारायचं नाव घेत नाही. भारतीय सीमेवर नेहमीच घुसखोरीचा प्रयत्न केला जातो आणि भारतीय लष्कराचे जवानही त्यांचा हा डाव उधळून लावतात. भारतीय लष्कराने आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून पुन्हा घुसखोरीचा डाव उधळून लावला आहे.

Terrorist Killed in Kupwara/File Photo
Mumbai Blast Threat Call: मुंबई, पुण्याला स्फोटानं उडवण्याची धमकी, सकाळी सकाळी आलेल्या फोनमुळं खळबळ, यूपी कनेक्शन समोर

कुपवाडाच्या माछल सेक्टरमधील काला जंगलात घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पाकिस्तानच्या हद्दीतून हे दहशतवादी भारतीय सीमा पार करून जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कराला मिळाली होती. त्यानंतर दोन्ही यंत्रणांनी संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. सर्च ऑपरेशन सुरू असतानाच, काला जंगलात पाच दहशतवाद्यांना जवानांनी ठार केलं.

Terrorist Killed in Kupwara/File Photo
PM Modi in America : पंतप्रधान मोदींचा अमेरिकेतून चीन-पाकिस्तानवर निशाणा, भारतात अल्पसंख्याकांशी भेदभाव होत असल्याच्या प्रश्नावर म्हणाले...

मागील शुक्रवारीही सुरक्षा दलाच्या जवानांनी मोठी कारवाई केली होती. कुपवाडाच्या जुमागुंडा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर शोधमोहीम राबवली होती. सुरक्षा दलाच्या जवान चालून येत असल्याचे दिसताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यांना जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. जवानांनी या चकमकीत पाच दहशतवाद्यांना ठार केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com