police  Saam Tv
महाराष्ट्र

latur crime : धक्कादायक! १५ जणांच्या टोळीकडून हातपाय बांधून बेदम मारहाण; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

latur crime news in Marathi : लातूरच्या हाडोळतीमध्ये जमावाने तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. या मारहाणीनंतर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

संदीप भोसले, साम टीव्ही प्रतिनिधी

लातूर : लातूरच्या अहमदपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरच्या अहमदपूरमध्ये १० ते १५ जणांच्या टोळीने केलेल्या मारहाणीनंतर तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूरमधील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती परिसरात दहा ते पंधरा जणाच्या टोळीने एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी १० ते १५ जणांच्या टोळीने हातपाय बांधून तरुणाला मारहाण केली. टोळीने मारहाण केल्यानंतर काही नागरिकांनी तरुणाला रुग्णालात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर मागील दिवसांपासून तरुणावर उपचार सुरु होते. मात्र, आज शनिवारी उपचार घेताना तरुणाचा मृत्यू झाला.

तरुणाच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ११ जणांविरोधात लातूरच्या अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या तरुणाच्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावात एक तरुण हातात बिअरची काचेची बाटली फोडून रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीवर हल्ला चढवत जखमी करत होता. हाडोळती गावात बुधवारी सकाळी आठ वाजता हा प्रकार घडत होता. त्यामुळे या तरुणाला गावातील जमावाने हातापायांना बांधून मारहाण केली होती.

मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी अहमदपूर येथे पाठवण्यात आले होते. मात्र गंभीर दुखापत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले होते. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव दिलीप उर्फ विलास नागोराव वाळिंग्रे असं आहे.

या प्रकरणी आता मृत तरुणाच्या आईच्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीस ठाण्यात ११ जनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: १० वर्ष ९ ते ५ नोकरी; सकाळी ४ वाजता उठून अभ्यास; पाचव्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS नविता कुमारी यांचा प्रवास

Cheese Recipe: घरीच झटपट बनवा बाजारात मिळणार मलईदार टेस्टी चीज, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण फक्त OTP द्वारेच होणार, पुणे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

Coconut Water Vs Glucose: नारळ पाणी की ग्लुकोज? कडाक्याच्या उन्हात काय पिणं योग्य? वाचा...

Crime News: सुट्टी नाकारल्याने सुरक्षारक्षकाचं डोकं सटकलं; बँक मॅनेजरच्या छाती घातली गोळी

SCROLL FOR NEXT