malegoan court grants pre arrest bail to sushma andhare Saam tv
महाराष्ट्र

Sushma Andhare : अटक टळणार! मालेगाव न्यायालयात सुषमा अंधारे यांना जामीन मंजूर

malegoan court grants pre arrest bail to sushma andhare : आता सुषमा अंधारे या अंतरिम जामीनासाठी लवकरच मालेगाव येथे येथील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik :

एका दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज केलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना आज (शुक्रवार) मालेगाव येथे दिलासा मिळाला आहे. मालेगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने अंधारे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश न्यायाधीश एस यू बघेले यांनी दिला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मालेगाव येथे अमन परदेशी यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विराेधात पाेलिसांत तक्रार केली हाेती. या तक्रारीमध्ये परदेशी यांनी सुषमा अंधारे यांनी हिंदू देव देवतांच्या अवमान केल्याचे म्हटले हाेते. पाेलिसांनी त्याची शहनिशा करत अंधारे यांच्यावर मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात (भा. द. वि. कलम 295(अ) नुसार) गुन्हा दाखल केला हाेता.

या प्रकरणात अटक टळावी यासाठी सेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मालेगाव कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याच्यावर सुनावणी झाली. न्यायाधीश एस यू बघेले यांनी सुषमा अंधारे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. आता त्या अंतरिम जामीनासाठी लवकरच मालेगाव येथे येथील अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

SCROLL FOR NEXT