Maharashtra BJP Candidate : सातारा लाेकसभा मतदारसंघासाठी उदयनराजे भाेसले, नरेंद्र पाटील समर्थक आक्रमक; राजेंसाठी मराठा समाज उतरला रस्त्यावर

Udayanraje Bhosale : लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर झाल्या. यामध्ये सातारा लाेकसभा मतदारसंघचा समावेश नव्हता.
maharashtra lok sabha election karyakarta demands udayanraje bhosale candidate for satara lok sabha constituency
maharashtra lok sabha election karyakarta demands udayanraje bhosale candidate for satara lok sabha constituencysaam tv

ओंकार कदम / सिद्धेश म्हात्रे

Udayanraje Bhosale Latest Marathi News :

लाेकसभा निवडणुकीची (lok sabha election 2024) तारीख येत्या एक दाेन दिवसांत जाहीर हाेण्याची शक्यता आहे. तरीही अद्याप सातारा लाेकसभा मतदारसंघात (satara lok sabha constituency) महायुतीचा (mahayuvti) आणि महाविकास आघाडीचा (mahavikas aghadi) उमेदवार निश्चित झालेला नाही. महायुतीतून भाजपचे (bjp) राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले (mp udayanraje bhosale) यांना उमेदवारी द्यावी यासाठी उदयनराजे सर्मथकांसह मराठा समाजाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. दूसरीकडे नवी मुंबईत माथाडी कामगारांनी बैठक घेत भाजपने नरेंद्र पाटील (mathadi leader narendra patil) यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. (Maharashtra News)

लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या (bjp candidate list 2024) जाहीर झाल्या. यामध्ये सातारा लाेकसभा मतदारसंघाचा समावेश नव्हता. खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाची घाेषणा अद्याप न झाल्याने साताऱ्यातील उदयनराजे समर्थक आणि मराठा समाज आक्रमक झाल्याचे आज (शुक्रवार) पाहायला मिळाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साताऱ्यातील शिवतीर्थ येथे मराठा समाज व उदयनराजे समर्थकांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. दरम्यान गुरुवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम यांना उदयनराजे समर्थकांनी घेराव घालत उदयनराजेंच्या उमेदवारीची घाेषणेचे काय असा सवाल केला.

maharashtra lok sabha election karyakarta demands udayanraje bhosale candidate for satara lok sabha constituency
Sindhudurg Chipi Airport : सिंधुदुर्गहून बंगळुरू, हैदराबादसाठी विमान; चिपी विमानतळ सज्ज, जाणून घ्या फ्लाईटची वेळ, दिवस व तिकीट दर

भाजपने नरेंद्र पाटील यांना उमेदवारी द्यावी : माथाडी कामगार

सातारा लोकसभा मतदार संघातून भाजपने महायुतीची उमेदवारी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना द्यावी अशी मागणी माथाडी कामगारांनी एपीएमसीच्या बैठकीत केली. एपीएमसी बाजारपेठेतील पाचही मार्केटचा नरेंद्र पाटील यांना पाठिंबा असून मागील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र पाटील यांना चांगली मते मिळाली होती. भाजप महायुतीने पाटील यांना उमेदवारी दिल्यास यंदा विजयी गुलाल उधळू असा विश्वास माथाडी कामगारांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

maharashtra lok sabha election karyakarta demands udayanraje bhosale candidate for satara lok sabha constituency
Satara Water Scarcity News : सोळशी, नांदवळ, सोनके परिसरात भीषण पाणीटंचाई; नायगावमध्ये महिलांचा हंडा माेर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com