फैयाज शेख, साम टीव्ही
मुंबई नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळ वाहनांच्या तब्बल ७ किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून वाहतूक कोंडीपासून सुटका नेमकी कधी होणार, असा सवाल उपस्थित करीत आहेत. सध्या ट्रॅफिक पोलिसांच्या वतीने वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबई-नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway Traffic) मोठी वाहतूक कोंडी होत आहेत. वाहनचालकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शहापूर तालुक्यात विविध ठिकाणी गेल्या 3 वर्षांपासून आसनगाव, वाशिंद गावावळ पुलाची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत.
या कामामुळे अनेकदा वाहतूक कोंडी निर्माण होते. पोलिसांकडून (Maharashtra Traffic Police) तातडीने ही वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र, यावेळेस सलग ८ दिवसांपासून परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहेत. त्यामुळे शहापूरहून कामानिमित्त ठाणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
आज शनिवारी पहाटेपासूनच शहापूरजवळ मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या तब्बल ७ किलोमीटपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. आटगावपासून पुढे चेरपोली, शहापूर, आसनगाव,वाशिंदपर्यंत या वाहनांच्या रांगा आहेत.
त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून यापासून सुटका कधी होणार, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. सध्या पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यांना खूपच अडचणींचा सामना करावा लागतोय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.