ajit pawar vs eknath shinde group Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Maharashtra Political News : निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसलाय. रायगडमधील बड्या नेत्याने अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

Vishal Gangurde

रायगडमध्ये भरत गोगावले यांचे कट्टर समर्थक सुशांत जाबरे यांनी अजित पवार गटात प्रवेश

सुशांत जाबरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार गटामध्ये प्रवेश

सिंधुदुर्गात काका कुडाळकर यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

या उलटफेरामुळे राज्यातील महायुती आणि विरोधी पक्षांमधील राजकीय समीकरणे बदलणार

सचिन कदम, साम टीव्ही

आगामी निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील नेत्यांचा सत्ताधारी पक्षात प्रवेश सुरु आहेत. दुसरीकडे महायुतीतही फोडाफोडीचं राजकारण सुरु आहे. रायगडमध्ये अजित पवार गटाने एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. रायगडमधील मंत्री भरत गोगावले यांचा कट्टर समर्थकाने शेकडो कार्यकर्त्यांसहित अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

रायगडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेच्या दासगाव खाडी पट्टा जिल्हा परिषद मतदारसंघातील संभाव्य उमेदवार सुशांत जाबरे यांनी शेकडे कार्यकर्त्यांसोबत आज रविवारी अजित पवार गटात प्रवेश केला.

जाबरे यांचा खासदार सुनील तटके, स्नेहल जगताप यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला. सुशांत जाबरे हे महाडच्या दासगाव खाडी पट्टा विभागातून रायगड जिल्हा परिषदेसाठी संभाव्य निश्चित उमेदवार होते. तर मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे निकटवर्तीय होते. सुशांत जाबरे यांच्या या प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे. तर मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

अजित पवार गटाला सिंधुदुर्गात शिवसेनेचा धक्का

अजित पवार गटाला देखील सिंधुदुर्गात जोरदार धक्का बसलाय. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हा कार्यकारी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी अजित पवार यांची साथ सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे सिंधुदुर्गात जोरदार वाहत आहेत. याचदरम्यान शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षप्रवेशाचा धडाका लावला आहे. काका कुडाळकर यांच्या प्रवेशामुळे शिंदेच्या शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

BMC Election : महापालिकेची ही शेवटची निवडणूक, हातातून मुंबई गेली तर...; राज ठाकरे स्पष्टच बोलले, VIDEO

SCROLL FOR NEXT