Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

Mumbai Crime News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. त्यांनी बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक केली.
Bribe Case
Bribe CaseSaam tv
Published On
Summary

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बीएमसी अभियंता अभिजित दिक्षित याला अटक केली.

फॅक्टरी लायसन्ससाठी दिक्षित याने मागितली होती ७ लाख रुपयांची लाच .

तडजोडीनंतर ३.५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना एसीबीकडून अटक

झडतीदरम्यान कार्यालयात ५ लाख रुपये जप्त

आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बीएमसीच्या के/ईस्ट वॉर्डमध्ये धडक कारवाई करून दुय्यम अभियंता अभिजित दिक्षित याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. फॅक्टरी लायसन्ससाठी दिक्षित यांनी तक्रारदाराकडून तब्बल 7 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर हा सौदा 3.5 लाखांवर अंतिम झाला.

Bribe Case
Sports legend Death : भारताच्या स्टार खेळाडूचं निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

मिळालेल्या माहितीनुसार, 3.5 लाख रुपयांची लाच स्वीकारताच ACB टीमने दिक्षित याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर कार्यालय झडतीत 5 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. तसेच या प्रकरणात घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.

Bribe Case
Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

या प्रकरणी गुन्हा क्रमांक 34/25 नोंद करण्यात आला आहे. दिक्षित यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ACBने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही शासकीय अधिकारी लाच मागत असल्यास तात्काळ तक्रार नोंदवा, त्यावर त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात येईल.

Q

एसीबीने कुठे कारवाई केली?

A

एसीबीच्या पथकाने मुंबईतील बीएमसीच्या के/ईस्ट वॉर्डमध्ये ही कारवाई केली

Q

 अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव काय?

A

दुय्यम अभियंता अभिजित दिक्षित असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

Q

लाच किती मागितली होती?

A

 दिक्षित याने तक्रारदाराकडून एकूण ७ लाख रुपयांची लाच मागितली होती. परंतु अंतिम तडजोड ही ३.५ लाख रुपयांसाठी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com