eknath shinde x
महाराष्ट्र

शिंदे सेनेकडून ठाकरे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यांनी हाती धरलं धनुष्यबाण

Setback for Thackeray and Sharad Pawar Factions: नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग. नाशिक ग्रामीण आणि सिन्नर तालुक्यातील अनेक तरुण पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. राजकीय वर्तुळात खळबळ.

Bhagyashree Kamble

  • शिवसेना ठाकरे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का.

  • अनेक तरूण पदाधिकाऱ्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश.

  • शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच कल्याणनंतर नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का बसला आहे. अनेक युवा पदाधिकाऱ्यांनी हाती धनुष्यबाण घेतलं आहे. शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश झाल्यामुळे नाशिकमध्ये शिंदेसेनेची ताकद वाढली आहे.

नाशिक ग्रामीण, सिन्नर तालुक्यातील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला गळती लागली आहे. अनेक युवा पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ठाण्यातील शुभ - दिप निवासस्थानी पदाधिकाऱ्यांनी धनुष्यबाण हाती घेतलं आहे.

या पक्षप्रवेशाबाबत माजी खासदार हेमंत गोडसे म्हणाले, 'स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जाहीर झालेले आहेत. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी (श.प) गटातून अनेक सिन्नर तालुका आणि नाशिक ग्रामीण पट्ट्यातून अनेक तरुणांनी शिवसेनेमध्ये आज प्रवेश केला आहे'; अशी माहिती गोडसे यांनी दिली.

'जेव्हा निवडणूक जाहीर होतात, तेव्हा ज्या पक्षावर अधिक विश्वास असतो. त्याकडे तिथे येणाऱ्यांची ओढ असते. नाशिक ग्रामीण आणि सिन्नर तालुकासह अनेक ठिकाणी आम्हाला यश मिळेल', असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.

'लोकांना विकास कामे आणि काम करणारं नेतृत्व हवं असतं. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लोकांसाठी अहोरात्र काम करतात. ते २४ तास पैकी १८ तास काम करतात. काम करणारं नेतृत्व हे राज्याला लाभलं आहे. त्यामुळे महायुतीमध्ये काम करण्याची ओढ या ठिकाणी आहे', असं गोडसे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MNS-Shivsena: संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये २० मिनिटं चर्चा; लवकरच युतीची घोषणा होणार

Akola : मंत्र्यांसमोरच शिवसेनेच्या २ गटामध्ये तुफान राडा, एकमेकांच्या अंगावर धावले अन् खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न

Maharashtra Live News Update: संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

Bhimashankar Mandir: महत्त्वाची बातमी! भीमाशंकर मंदिर 3 महिन्यासाठी राहणार बंद; कारण काय?

Famous Actor : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याने आयुष्य संपवलं; मनोरंजनसृष्टीत खळबळ

SCROLL FOR NEXT