Uddhav Thackeray Saam tv
महाराष्ट्र

रायगडात शिवसेना ठाकरे गटाचा गड ढासळला; महत्त्वाचा नेता भाजपच्या गळाला

Shiv Sena (Thackeray) Leader Switches to BJP Ahead of Polls: रायगमधील राजकीय वातावरण तापलं. शिवसेना ठाकरे गटाला धक्का. माजी जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांचा भाजपात प्रवेश.

Bhagyashree Kamble

  • रायगडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला भाजपकडून झटका.

  • माजी जिल्हा संपर्क प्रमुखांचा पक्षाला रामराम.

  • अनेक पदाधिकाऱ्यांसह भाजपला दिली साथ.

आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वारे वेगानं वाहू लागली आहेत. प्रत्येक पक्षानं मोर्चेबांधणीला सुरूवात केलीये. तर, काही भागात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. अशातच रायगडमधील राजकीय वातावरण तापलंय. शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

रायगड़मध्ये शिवसेना ठाकरे गटाचा गड हळूहळू ढासळत चालला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. कारण, शिवसेना ठाकरे गटाचे माजी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख नागेंद्र राठोड यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागेंद्र राठोड नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राठोड यांनी भाजपच कमळ हाती घेतलं आहे. नागेंद्र राठोड यांच्यासह महाड, पोलादपुर, माणगावमधील असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केलं आहे. त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे.

हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील भाजप कार्यालयात पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार धैर्यशील पाटील उपस्थित होते. भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश भाजप पक्षासाठी महत्वाचा मानला जात आहे. यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: वडिलांच्या निधनानंतर आयुष्य बदललं! ना कॉलेज, ना कोचिंगशिवाय क्रॅक केल्या १२ सरकारी परीक्षा; IPS संदीप चौधरी यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: पुण्यातील एचएनडी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याचा आदेश आज होणार?

जिमवरून आल्यानंतर काय आणि कधी खाल्लं पाहिजे?

BMC Election : मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंची नवी रणनीती? ठाकरेसेना देणार नव्या चेहऱ्यांना संधी, VIDEO

Trikadasha Yog: आज 18 वर्षांनंतर बुध-यम बनवणार त्रिएकादश योग; करियरमध्ये होणार चांगली प्रगती, पैसाही मिळणार

SCROLL FOR NEXT