

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षानं कंबर कसली आहे. राजकीय पकड मजबूत करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून हालचाल सुरूये. अशातच नांदेडमध्ये मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांनी काँग्रेसचा हात मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ३७ जणांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
नांदेडच्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढणार आहे. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर यांच्यासह मोठा गट काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश कऱणार आहे. सुमठाणकर यांच्यासह एकूण ३७ जण काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत.
४ माजी नगराध्यक्ष, २३ माजी नगरसेवक, ८ नगरसेवक, २ माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी पंचायत समिती सभापती, माजी पंचायत समिती सदस्य काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. हा पक्षप्रवेश सोहळा २८ ऑक्टोबर रोजी नांदेडच्या देगलूर येथे पार पडणार आहे. हा पक्षप्रवेश सोहळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
या सर्वांच्या पक्षप्रवेशाने नांदेडच्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये होणारी ही इनकमिंग या मतदारसंघात काँग्रेस पक्षाला उभारी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे नांदेडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.