Nagpur Katol Accident News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur Accident: नागपुरात लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू

Satish Daud

Nagpur Katol Car Truck Accident News

नागपूर जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या घटनेत कारमधील ६ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. अंगाचा थरकाप उडवणारी घटना काटोल तालुक्यातील ताराबोडी परिसरात शुक्रवारी (१६ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघाताची माहिती मिळताच काटोल पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहे. अपघातात एकजण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

रमेश हेलोंडे, सुधाकर मानकर, विठ्ठल धोटे, अजय चिखले, वैभव चिखले, मयुर इंगळे अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर जगदीश ढोणे गंभीर जखमी झाला आहे.

प्राथामिक माहितीनुसार, मृत व्यक्ती हे काटोल तालुक्यातील (Nagpur News) रहिवासी होते. शुक्रवारी ते नागपूरमध्ये एका लग्नसमारंभासाठी आले होते. लग्नाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हे सर्वजण कारमधून काटोलच्या दिशेने परतत होते.

मध्यरात्री कार सोनखांब आणि ताराबोडी दरम्यान आली असता, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की कारमधील ६ जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच जखमीवर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

SCROLL FOR NEXT