Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Surabhi Jayashree Jagdish

सतत थंडी वाजणं

तुम्हाला एसी लावला की लगेच थंडी वाजू लागते का? घरात किंवा ऑफिसमध्ये तुम्हाला सतत थंडी वाजते का..मात्र याच्या कारणांचा विचार केलाय का?

Constant Chills

व्हिटॅमिन B12 ची कमतरता

शरीरात निरोगी लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी B12 आवश्यक असतं. त्याची कमतरता झाल्यास अॅनिमिया होऊ शकतो. यामुळे सतत थंडी वाजल्यासारखे वाटू शकते.

Cold Sensitivity

कमी वजन असणं

शरीरातील चरबी उष्णता टिकवून ठेवण्याचं काम करते. वजन कमी असल्यास ही नैसर्गिक संरक्षणाची पातळी कमी होते. त्यामुळे इतरांपेक्षा जास्त थंडी जाणवू शकते.

Vitamin B12 Deficiency

शरीरात पाण्याची कमतरता

पाणी शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पुरेसे पाणी न प्यायल्यास शरीराचे संतुलन बिघडू शकते.यामुळे नेहमी थंडी वाजल्यासारखे वाटू शकते.

Iron Deficiency

हायपोथायरॉईडीझम

थायरॉईड ग्रंथी कमी कार्यरत असल्यास चयापचयाचा वेग मंदावतो. यामुळे शरीरात उष्णता कमी निर्माण होते. थंडी संवेदनशीलता आणि थकवा वाढू शकतो.

Anemia Symptoms

रक्ताभिसरण कमी असणं

रक्तप्रवाह योग्य प्रकारे न झाल्यास हात-पाय थंड पडतात. यावेळी बोटांमध्ये आणि पायांमध्ये थंडी जास्त जाणवते. यामुळे सतत गारवा जाणवू शकतो.

Low Body Weight

लोहाची कमतरता

लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होऊ शकतो. यामुळे पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. परिणामी वारंवार थंडी वाजते.

Dehydration Symptoms

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

High Blood Sugar | saam tv
येथे क्लिक करा