Shreya Maskar
प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये वसलेला आहे. प्रतापगड हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवले.
१६५६ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला 'प्रतापगडाची लढाई' या युद्धासाठी ओळखला जातो; ज्यामध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचा सरदार अफझल खान याचा पराभव केला होता.
प्रतापगड ज्याचा अर्थ 'शौर्याचा किल्ला' असा होतो. मूळतः 'भोरप्या टेकडी' (किंवा 'धोरप्यागड') अशा नावाने पूर्वी प्रतापगड ओळखला जायचा.
प्रतापगड किल्ला मराठा राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६५६ मध्ये बांधला. त्यांच्या राजवटीत अगदी शून्यातून (पायापासून) पूर्णपणे उभारला गेलेला हा पहिलाच गिरीदुर्ग होता आणि त्याच्या बांधकामावर प्रसिद्ध मराठा वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांनी देखरेख केली होती.
पश्चिम घाटात एक महत्त्वपूर्ण लष्करी ठाणे प्रस्थापित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्याची उभारणी केली. जावळीच्या खोऱ्यात आणि 'पार घाटा'च्या संरक्षणासाठी, कोयना-नीरा नद्यांच्या खोऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रतापगड किल्ला बांधला.
प्रतापगड येथे दोन मुख्य मंदिरे आहेत. यात भवानी देवीचे मंदिर आणि महादेवाचे मंदिर यांचा समावेश आहे. मंदिरात देवीची अष्टभुजा मूर्ती विराजमान आहे.
सातारा रेल्वे स्टेशनला उतरा त्यानंतर रिक्षा किंवा बसने तुम्ही प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचू शकता. तुम्ही येथे ट्रेकिंगचा आनंद देखील घेऊ शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.