माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या जवळच्या नेत्याचा भाजप प्रवेशामुळे मोठा धक्का बसला.
मलकापुरात काँग्रेस गळती सुरू असून पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मनोहर शिंदे यांचा भाजप प्रवेश डॉ. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून हाताची साथ सोडून कमळ हाती घ्यायचे की नाही अशा तळ्यात-मळ्यात असणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय, आणि कराड तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसेच मलकापुरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी गुरुवारी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांच्याकडे पाठवत कॉँग्रेसला जय महाराष्ट्र केला असून आता ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोहर शिंदे यांचा भाजप प्रवेश नाममात्र राहिला असून लवकरच ते कमळ हाती घेणार आहे. तसेच काँग्रेसचे काही निष्ठावंत नेते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अॅड उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यासोबतही जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉँग्रेस तेथे चाचपणी करत आहे.
यामुळे मलकापुरात मोठ्या राजकीय उलथापालथ निर्माण झाल्या आहेत. तेथे काँग्रेससह पक्षाच्या निष्ठावंत मोठे चिंतेत सापडले आहे. मलकापुरात निर्माण झालेली राजकीय स्थितिमुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का बसला आहे.कराड दक्षिणचे आमदार डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश होणार आहे. तत्पूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती. यावेळीच हा पक्षप्रवेश निश्चित झाला होता.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग पाहायला मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रोजच शेकडो कार्यकर्ते आणि दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करत असून विरोधी पक्षाला अक्षरशः सुरुंग लागल्याचे दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार गट यांच्यासह कॉँग्रेसचा देखील बालेकिल्ला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर अनेक बडे नेते भाजप गळाला लावत असून आगामी निवडणुकीत काय चित्र स्पष्ट होते. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.