मुंबई : महाराष्ट्रात महायुतीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने १०० ते १०५ जागांची मागणी केलीय. भाजपने १६० आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने ६० ते ८० जागांसाठी दावा केल्याच माहिती मिळतेय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झालीय. लवकरच जागावाटपाची अंतिम यादी समाोर येईल. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रादेशिक नेतृत्वाचा निवडणुकीच्या गणितावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
राज्यात महायुतीमध्ये जागांवरून संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता (Mahayuti Seat Sharing Issue) आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात सेनेने शंभरहून अधिक जागांसाठी दावा केला होता, असं पक्षाच्या एका कार्यकर्त्याने सांगितलं होतं. लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीबद्दल अमित शहा यांना सादरीकरण देण्यात आलं. तेव्हा मराठी मतं राखली गेल्याचा दावा शिंदेसेनेने केलाय.
शंभरपेक्षा जास्त जागा मिळाल्या तरच आम्ही ठाकरे गटाचा सामना करू. महाविकास आघाडीला पराभूत करू, असं शिंदे गटाने अमित शाह यांना सांगितलंय. या महिन्यात जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होवू (Maharashtra Assembly Election) शकतो. अजून निवडणुकीच्या तारख जाहीर झालेल्या नाहीत. शिंदे गटाला ८० ते ९० तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ५० ते ६० जागा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपने २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव दिल्याच्या वृत्ताचं खंडन केलंय. ही माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार मिळतेय.
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरून महायुतीमध्ये (bjp) जुंपण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीसारखं विधानसभेत उमेदवार जाहीर करण्यात विलंब होऊ नये, अशी भूमिका शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. विलंबामुळे प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही.परिणामी अपेक्षित मतं मिळाली नाही, अशी महायुतीच्या अनेक कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती.
प्रत्येक पक्षाच्या जागांची संख्या निश्चित झाल्यानंतर, जिंकण्याची क्षमता लक्षात घेवून मतदारसंघांची देवाणघेवाण सुद्धा केली जाऊ (Shinde Group) शकते. अजित पवार (Ajit Pawar) गटाने साठ ते ऐंशी जागांची मागणी पूर्ण केली नाही, तर महायुतीचं आकड्यांचं गणित बदलु शकतं, असं एका राजकीय निरीक्षकाने सांगितलंय. लोकसभा निवडणुकीतील कामगिरी पाहता भाजपला १०० हून अधिक जागा जिंकण्यासाठी १५० हून अधिक जागा लढवाव्या लागतील, असं भाजपच्या कार्यकर्ते म्हणत आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सुमारे १६० जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी १०५ जागा जिंकल्या होत्या. यावेळी कोणतीही लाट नसल्यामुळे प्रत्येक जागा लढवावी लागणार आहे. महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांना पुरेशा जागा निवडून आणाव्या लागतील. अन्यथा, सरकार स्थापन करू शकत नाही, असं देखील भाजप नेते म्हणत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख सुनील तटकरे म्हणाले की, जागावाटपाच्या चर्चेदरम्यान अमि शहा यांनी सन्मानपूर्वक वाटपाचं आश्वासन दिलं होतं. गरज पडल्यास वैयक्तिक हस्तक्षेप करण्याचं देखील त्यांनी आश्वासन दिलं होतं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.