Mahayuti Seat Sharing: महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; 'त्या' चारही जागा शिंदे गटाला मिळणार?

Maharashtra Lok Sabha 2024: छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mahayuti Seat Sharing Lok Sabha
Mahayuti Seat Sharing Lok SabhaSaam Tv

Mahayuti Lok Sabha Seat Sharing

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन जवळपास महिनाभराचा कालावधी लोटला. मात्र, अद्यापही महायुतीतील जागावाटपाचा तिढा काही सुटलेला नाही. जागावाटपावरून महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. अशातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Mahayuti Seat Sharing Lok Sabha
Uddhav Thackeray: मातोश्रीच्या खास शिलेदारासाठी उद्धव ठाकरे मैदानात; मुंबईत आज जाहीर सभा घेणार

छगन भुजबळ नाशिक लोकसभा मतदारसंघातून (Lok Sabha Election 2024) निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग देखील लावली होती. मात्र, शुक्रवारी भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं. त्यांच्या माघारीनंतर महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीच्या उमेदवारांची फायनल यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्तर पश्चिम मुंबई, कल्याण, ठाणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या ४ जागा शिंदे गटाला (Eknath Shinde) सोडण्यात येणार आहेत. नाशिकमधून हेमंत गोडसे यांचं तिकीट फायनल झाल्याची माहिती आहे.

नाशिकच्या जागेसाठी आता फक्त औपचारिक घोषणा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तर पालघर, उत्तर मध्य मुंबई तसेच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजप आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला फक्त ४ जागेवर समाधान मानावं लागणार आहे.

महादेव जानकर यांना एक जागा अजित पवार गटाने दिली आहे. त्याऐवजी त्यांना एक विधान परिषद जागा मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपनं आतापर्यंत लोकसभेच्या २४ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने आतापर्यंत ९ जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे. दुसरीकडे अजित पवार गटाने ४ जागा जाहीर केल्या आहेत.

Mahayuti Seat Sharing Lok Sabha
Parbhani Lok Sabha: महायुतीच्या उमेदवारांसाठी थेट PM मोदी प्रचाराला; आज नांदेड अन् परभणीत जंगी सभा घेणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com