Ajit Pawar, Eknath Shinde and Devendra Fadnavis saam tv
महाराष्ट्र

Muncipal Election : कोल्हापुरात महायुती, पण सांगलीत एका कारणानं फिस्कटलं, शिंदेसेनेचा थेट भाजपला इशारा

Kolhapur Election : नाशिकसारख्या महत्वाच्या महापालिका निवडणुकीत महायुती फिस्कटली असताना, कोल्हापुरात महायुतीवर शिक्कामोर्तब झालं आहे. महायुतीतील भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांनी 81 जागांसाठी उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. तर सांगलीत महायुती फिस्कटली आहे.

Nandkumar Joshi

रणजीत माजगांवकर, कोल्हापूर | साम टीव्ही

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती होणार आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी ही घोषणा केली. या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र येणार आहे. आता महायुतीचीही घोषणा झाली आहे. त्यामुळं यंदाची पालिका निवडणूक रंगतदार होणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. कोल्हापुरात महायुती एकत्र आली असली तरी, सांगलीत महायुती फिस्कटली आहे. या ठिकाणी शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. काही ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. तरीही कोल्हापुरात महायुतीच्या जागावाटप आणि महायुतीची घोषणा झाली नव्हती. मात्र, आज सोमवारी प्रमुख नेत्यांनी महायुतीची घोषणा केली. मागील आठ दिवस तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठका झाल्या. आज ८१ उमेदवारांच्या नावांची यादी निश्चित केली आहे. भाजप ३६, शिंदे शिवसेना ३० आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट १५ जागांवर निवडणूक लढणार आहेत, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

धनंजय महाडिक म्हणाले की, ''ऐतिहासिक महायुती झाली आहे. विकासाची ब्ल्यू प्रिंट घेऊन जाणार आहोत. जनतेचा जाहीरनामा घेणार. त्यानुसार पाच वर्षे विकासकामे करणार आहोत.'' कोल्हापूर कस्सं....टॅगलाइन लावून लोकांना फसवायचे, हे आता चालणार नाही, असा टोलाही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला. ही निवडणूक आता सोपी झाली आहे. कारण लोक जागरूक झाले आहेत, असेही ते म्हणाले. महायुतीच्या उमेदवारांची यादी उद्या सकाळी जाहीर करणार आहोत. निवडणुकीत एकत्र प्रचार करणार आहोत, असेही ते म्हणाले.

प्रकाश आबिटकर म्हणाले की, शहराच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. चांगल्या उमेदवारांची निवड केली आहे. तिन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. विकासाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही एक संधी असून, याचा कौल १५ तारखेला आम्हाला मिळणार आहे. शहरात महायुतीची सत्ता असेल.

हसन मुश्रीफ म्हणाले की, इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यातून उमेदवार निवडणे कठीण होते. प्रचाराचा शुभारंभ लवकरच करू. शहरातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यात येतील. यावेळी त्यांनी विरोधकांना टोला लगावला. मोठमोठ्या गप्पा मारून विकास करता येत नाही. कारण विरोधक विकास करू शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

नाराजांची समजूत काढू

महायुतीची घोषणा झाल्यानंतर घटकपक्षांमध्ये स्थानिक पातळीवर नाराजी असल्याचे दिसून आले. नाराजी असल्याचे स्वतः महाडिक यांनी मान्य केले. मोठ्या प्रमाणात नाराजांची संख्या आहे. आम्ही दोन दिवसांत त्यांना समजावून सांगू. महायुतीची सांगड घालताना अनेकांवर अन्याय झाला हे मान्य आहे, परंतु त्यांची समजूत काढण्यात येईल. धनश्री तोडकर यांची देखील भेट घेऊन नाराजी दूर करू. काँग्रेसचे अनेक इच्छुक संपर्कात असले तरी आमची यादी फिक्स झाली आहे, असेही महाडिक म्हणाले. कृष्णराज महाडिक यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण राज्य पातळीवर नेत्यांच्या घरात उमेदवारी न देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे कृष्णराज यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. कृष्णराज महाडिक हे छावा आहेत. आता ते दोन पावलं मागे आलेले आहेत. पुन्हा ते मोठी उडी घेतील, असा विश्वास व्यक्त करतानाच आम्ही पक्षाचे आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत, असेही ते म्हणाले.

सांगलीत शिंदे शिवसेना स्वबळावर लढणार

विजय पाटील, सांगली | साम टीव्ही

कोल्हापुरात महायुतीचं त्रांगडं सुटलं असलं तरी, सांगली महापालिका निवडणुकीत महायुतीत बिनसलं आहे. महायुती तुटली असून, शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढणार आहे. भाजपसोबत असलेली युती सांगली महापालिकेत तुटली, अशी घोषणाच शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी केली. भाजपने शिवसेना शिंदे गटाला सांगलीत कमी लेखलं. येणाऱ्या निवडणुकीत भाजपला शिवसेना शिंदे गटाची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. या निवडणुकीत स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याचंही देसाई यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress-Vanchit Alliance: काँग्रेस वंचित युती, वर्षा गायकवाड नाराज? गायकवाडांनी नाराजीनाट्यावर सोडलं मौन

Pune Corporation Election: पुण्यात काँग्रेसच्या हातात मशाल; काँग्रेस-ठाकरे सेनेचं जागावाटप जाहीर

मुंबईत भीषण अपघाताचा थरार; भरधाव बेस्ट बसने अनेकांना चिरडले, ४ जणांचा मृत्यू

दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपला दूर सारत राष्ट्रवादी एकत्र

मुंबईत राजकारण तापलं; निवडणुकीसाठी आतापर्यंत इतक्या उमेदवारांनी अर्ज घेतले, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT