अजित पवारांनी राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात असल्याचे वक्तव्य केले.
त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी “तिजोरीचा मालक आमचाच” असा टोला लगावला.
या वक्तव्यामुळे भाजप–राष्ट्रवादी यांच्यातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्याची चर्चा.
निवडणूक प्रचारात या वादाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Chandrakant Patil Slam Ajit Pawar : सरकारी निधीवरुन सत्ताधाऱ्यांमध्येच जुंपली आहे. तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच आहे असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलंय. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत, कुणाला निधी द्यायचा आणि कुणाला नाही हे आपल्या हाती असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. त्यावरुन आता चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने आता महायुतीमधील धुसफूस समोर आली आहे.
तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही, आणि जर का ती उघगडली तर त्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला आहे. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आणखी कोणाकडे असल्या तरी त्यांच्यावर मुख्यमंत्री असतात. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये प्रचार सभेच्या शुभारंभ प्रसंगी चंद्रकांतदादा पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने आता राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये कलह वाढण्याची शक्यता वर्तवण्यत येत आहे.
विरोधक प्रचारात म्हणतील आमच्याकडे तिजोरीच्या चाव्या आहेत. पण तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका. विरोधकांकडे एक मंत्री असले तर आम्ही इकडे दोन मंत्री आहोत. आम्ही महायुतीत असल्यामुळे एकमेकांवर टीका करायचे नाही असं ठरवलं आहे. आतापर्यंत मुश्रीफ यांनी टीका केली नाही पण त्यांनी टीका केली तर मी कशी टीका करतो हे तुम्हाला माहिती आहे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. सत्ताधारी आणि विरोधक प्रचारात उतरले आहेत. महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये आधीच कलगीतुरा रंगला आहे. आता त्यात राष्ट्रवादी काँग्रेसची भर पडली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसमधून याबाबत अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. अजित पवार आणि चंद्रकांत पाटील या दोन दिग्गज नेत्यांच्या वक्तव्यावरून महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.