Pratap Sarnaiak Saam Tv News
महाराष्ट्र

फडणवीस, शिंदे अन् पवार हे 'फेव्हिकॉल का मजबूत जोड'; मंत्री प्रताप सरनाईक असं का म्हणाले?

Pratap Sarnaiak: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. या चर्चेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फेटाळलं आहे.

Bhagyashree Kamble

  • प्रताप सरनाईक यांनी शिंदे-फडणवीस नाराजगीच्या चर्चेला फेटाळलं.

  • शिंदे-फडणवीस-अजित पवार हे "फेविकॉलचं जोड" असल्याचं विधान.

  • स्वारगेट बसस्थानकातील निलंबित अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदलीचे आदेश.

  • भारत-पाकिस्तान सामन्यातील जुगारावर संजय राऊत यांच्या विधानावर प्रत्युत्तर.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र, या चर्चांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फेटाळलं आहे. 'फडणवीस, शिंदे अन् पवार हे 'फेव्हिकॉल का मजबूत जोड' आहे. तसेच ते ब्रह्मा,विष्णू,महेश आहेत', असंही सरनाईक म्हणाले.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सारं काही अलबेल नसल्याची चर्चा आहे. याबाबत प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा सरनाईकांनी अशा चर्चांना अर्थ नाही, असं म्हणाले. 'अशा चर्चांना काहीही अर्थ नाही. चर्चा होत असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार हे फेव्हिकॉल का मजबूत जोड आहे. तसेच हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत', असं सरनाईक म्हणाले.

'राज्याला विकसित करण्यासाठी या तिघांनी महायुतीची स्थापना केली. राज्याचा विकास करण्यासाठी हे तिघे झटत आहेत. आता देखील सरकार चांगल्या पद्धतीनं काम करत आहे', असं सरनाईक म्हणाले. स्वारगेट बसस्थानकावर झालेल्या बलात्कार प्रकरणी दोन अधिकारी निलंबित झाले होते. त्यांची पुन्हा नेमणूक स्वारगेट डेपोवर झाल्याचं समजताच, सरनाईक यांनी तत्काळ या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश दिले.

राऊतांच्या आरोपांवर सरनाईकांची प्रतिक्रिया

'काल आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यावर दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळण्यात आला. या दीड लाख कोटी रुपयांमधील अधिकृतपणे 1000 कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले. तसेच या दीड लाख कोटी रुपयांमधून साधारण 25 हजार कोटी रुपये पाकिस्तानात गेले', असा मोठा आरोप संजय राऊतांनी केला होता.

याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विचारले असता, ते म्हणाले, 'माझ्याकडे काही व्हिडीओ आहेत. सर्वांनी काल मॅच बघितली. जेव्हा भारत मॅच जिंकला, तेव्हा त्यांना दुःख झालं. जर पाकिस्तान सामना जिंकला असता, तर अजून त्यांनी राजकारण केलं असतं. संजय राऊतांनी खेळाबाबत राजकारण करू नये', असं यावेळी सरनाईक म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT