Mahavikas Aghadi Saam Tv
महाराष्ट्र

Mahavikas Aghadi News : महाविकास आघाडीला पुन्हा धक्का बसणार?, आणखी एक नाराज घटकपक्ष महायुतीच्या वाटेवर

Maharashtra Political News : डॉ. राजेंद्र गवई अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर महाविकास आघाडी बरीच कमकुवत बनली आहे. शिवसेना-राष्ट्रवादीच्या फुटीमुळे अनेक बडे नेते महाविकास आघाडीतून बाहेर पडले आहे. त्यात आता आणखी एक घटक पक्ष महाविकास आघाडीवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया पक्षाचे नेते डॉ. राजेंद्र गवई महायुतीत सहभागी होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. डॉ. राजेंद्र गवई अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक आहेत.  (Latest Marathi News)

सगळे दरवाजे उघडे असणे आज काळाची गरज आहे. माझे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तीगत चांगले संबंध आहेत. मात्र इतर कुणाशीही संबंध नाहीत. अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपने संधी दिल्यास विचार करायला हरकत नाही, असं राजेंद्र गवई यांनी म्हटलं आहे. (Maharashtra News)

काँग्रेसने वेळोवेळी आमचा वापर केला

काँग्रेसने वेळोवेळी आमचा वापर करुन घेतला आहे. काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव हवं, पण बाबासाहेबांचा पक्ष नको. काँग्रेस आपल्या चिन्हावर मला अमरावती लोकसभा देण्यास तयार, तसा प्रस्ताव आला आहे. मात्र मी माझ्याच पक्षावर लढण्यास ठाम आहे, असं राजेंद्र गवई यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीत ऑल वेल नाही

आमची ताकद आम्ही दाखवली आहे. आम्ही पडलो तरी समोरच्यालाही आम्ही पाडू शकतो. महाविकास आघाडीत १०० टक्के नाराजी आहे. शरद पवार, प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकांवरुन महाविकास आघाडील ऑल वेल आहे असं वाटत नाही, असंही राजेंद्र गवई यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT