CM Eknath Shinde: 'मला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण...'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं देखील म्हटलं जातंय, या सर्वांव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनोख्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे.
CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde NewsSaam TV
Published On

Maharashtra Political News: राज्याच्या राजकारणात सध्या कोण कोणत्या पक्षात आहे हे ओळखणं सामान्य जनतेसाठी कठीण झालंय. नेतेमंडळी सातत्याने राजकीय डाव टाकत आहेत. तसेच विरोधक सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या कामांवर टीका करत आहेत. या सर्वांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना अनोख्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. (Latest Marathi News)

"गेली अनेकवर्षे मला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला जातोय पण विरोधकांचे स्वप्न काही साकार होत नाही. काही विरोधक तिरकी चाल चालतात, काही अडीच घरे चालणारे घोडे राजकारणात आहेत. जनता सोबत असल्याने विरोधकच नेहमी चितपट होतायेत. राजकीय विरोधकांशी लढा द्यायचा असेल तर आमच्या सारख्या विरोधकांना बुद्धीबळ खेळणे फार गरजेचे आहे." अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी विरोधकांना निशाणा साधला आहे.

CM Eknath Shinde News
Pune Crime News : 307 चा बदला 302 ने; पुण्यातील थिएटरबाहेर हत्येचा थरार, तलवारीने हल्ला करत तरुणाला संपवलं

गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंड केलं आणि मुख्यमंत्री पदी ते विराजमान झाले. महाराष्ट्राच्या राजकारणातील या भूकंपाने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. या प्रसंगाची आठवण करुन देत शिंदेंनी पुढे म्हटलं की, "गेल्या वर्षी आम्ही जी क्रांती केली त्यानंतर आम्हाला राजकारणातले ग्रँड मास्टर बोललात. ठाण्यात समाजकारणातील ग्रँड मास्टर आनंद दिघे आहेत.", असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

काल ठाण्यात बुद्धिबळ स्पर्धा होती. यावेळी बुद्धिबळ पटू विश्वनाथन आनंद या स्पर्धेत आले होते. त्यांचे स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी उपस्थित बुद्धिबळपटू स्पर्धकांना मर्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

CM Eknath Shinde News
Saamana Editorial: कळव्यातील मृत्युकांड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांचे कान उपटावेत; सामनातून एकनाथ शिंदेंसह तानाजी सावंतांवर जहरी टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com